WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

"बेबी डॉल" फेम गायिका कनिका कपूरला करोनाची लागण

Image

‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली गयिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार कनिका शुक्रवारी लंडनहून लखनऊला परतली आणि वैद्यकीय तपासणीत तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

लखनऊमध्ये चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. हे चारही जण करोना पॉझिटिव्ह आहेत. यात कनिकाचाही समावेश आहे.

लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने लागण झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतरही ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती. इतकंच नव्हे तर तिने डिनर पार्टीही ठेवली होती, असं म्हटलं जातंय.

कनिका ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. ‘बेबी डॉल’सोबतच तिने ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. काही रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.