WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर प्रा आ केंद्राला ३१ ऑक्टो. ला ताला ठोको आंदोलन

Image

● दोन महिन्यांपासून आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही... त्वरित डॉक्टरांची नियुक्ती द्या.... _______________________ Image

सुरज चाटे वणी :- राजूर कॉलरी येथील प्रा आ आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची मुख्यालय सोडून मार्डी येथे डेप्युटेशन वर पाठविल्यामुळे मागील दोन महिन्यापासून डॉक्टरच नाही. ताबडतोब डॉक्टर ची जागा भरण्यात यावी, हि मागणी केल्यावरही व तसे मागणीचे व ताला ठोको आंदोलनाच्या इशारा देऊनही संबंधित विभागाकडून काहीच कारवाई न केल्याने शेवटी गावातील पक्ष व संघटनांकडून ३१ ऑक्टो. १८ ला ताला ठोको आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन तशी सूचना करणारे निवेदन जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व सम्बंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

येथील प्रा आ केंद्रात दोन डॉक्टरची जागा आहे. परंतु मागील अनेक काळापासून इथे एकच डॉक्टर असून नवीनच रुजू झालेल्या डॉ अस्वले यांची स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत बिनसल्या मुळे त्यांना इथून मार्डी येथे डेप्युटेशन वर पाठविले आहे. परिणामी इथे डॉक्टरच नसल्याने येथील आरोग्य व्यवस्था डबघाईस आली असून व सध्या डेंग्यूचे रुग्ण गावात आढळल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या अनुषंगाने येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, मनसे, बसपा, राजूर विकास संघर्ष समिती व ग्राम विकास समिती,बिरसा ब्रिगेड आदींनी संयुक्तपणे दि १६ ऑक्टो ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित डॉक्टरची नियुक्त करावी अन्यथा प्रा आ केंद्राला कुलूप लावण्यात येईल अशा इशारा देण्यात आला होता व १० दिवसाचा अवधी दिला होता. परंतु संबंधित अधिकाऱ्याकडून काहीच करण्यात आली नाही.

परिणामी येथील पक्ष व संघटनांनी दि ३१ ऑक्टो. ला संयुक्त पणे ताला ठोको आंदोलन करण्याचे ठरविले असून तसे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर श्रीनिवास अंधेवार, कॉ कुमार मोहरमपुरी, माजी पं स सदस्य वसुंधरताई गजभिये, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानझोडे, जयंत कोयरे, नंदकिशोर लोहकरे, अनिल डवरे, महेश लिपटे, प्रदीप बांदूरकर आदी लोकांच्या सह्या आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.