WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विहिरीत उडी घेवून युवकाचीआत्महत्या, कुंभा येथील घटना

Image

•आत्महत्या की, घातपात? आहे. ग्रामस्थाच्या चर्चेला आले उधाण...!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील शुभम लोनबळे (वय 22 ) दि..10 मार्च 2020 पासून बेपत्ता होता. आज दि.12 ला काही लहान मूल गावातील विहीरी शेजारी खेळत असताना त्यांना विहिरीमध्ये शुभम यांचा मृत्युदेह तरंगताना आढळून आला. दरम्यान, लहान मुलांच्या गोंधळामुळे ही बाबा उघड़कीस आली असता समस्त गांवकऱ्यानी विहिरीकडे धाव घेतली.आणि बघताच कुंभावाशी शोकमय झाले. तो मृत्यूदेह शुभमचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर गावातील पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला फोनवरून या घटनेची माहिती दिली.

तात्काळ मारेगांव पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत्यूदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी मारेगांव ग्रामीण रुग्णालय येथे मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र शुभम ची आत्महत्या आहे की, घातपात? असे गांवकऱ्याकडुन बोलल्या जात आहेत. या प्रकरणाचा मारेगांव पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......