WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अजब पत्नीची, गजब कहाणी, होळीला घरी या नाहीतर मी दुसऱ्याबरोबर पळून जाईन

Image

•मोबाईल च्या दुनियेत कधी काय वायरल होईल ते सांगता येत...!!

भागलपूर - पोलीस विभागात काम करताना किंवा सैन्य दलात काम करत असलेल्या जवानांचा सुट्टीसाठी नेहमीच हिरमोड होतो. सणासुदीच्या दिवशी त्यांची ऑन ड्युटी असते, हेच आता सर्वांनी मान्यच केलं आहे. मात्र, कुठल्याच सणाला सुट्टी मिळत नसल्याने, एका पोलिसाने पत्र लिहून आपली व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मांडली आहे. होळीमुळे पोलीस विभागाकडून सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सीटीएस नाथनगर येथील एका प्रशिक्षक पोलीस शिपायाने सीटीएस प्रमुखांकडे अर्ज केला असून या अर्जद्वारे या पोलिसाने आपली वेगळीच कथा वरिष्ठांकडे मांडली, सध्या या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या अर्जात लिहिले आहे की, 5 मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या पत्नीचा फोन आला होता. ''यावेळी होळीच्या सणाला तुम्ही घरी यायचंय, नाही आलात तर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल,'' पत्नीचे हे वाक्य ऐकून मी खूप डिस्टर्ब झालो आहे, असे संबंधित पोलिस शिपायाने आपल्या निवेदन अर्जात म्हटल्याचे वृत्त ईटीव्ही भारतच्या हिंदी वेबसाईटने प्रकाशित केले आहे.

शिपायाने पुढे विनंतीही केली आहे. मला होळीसाठी 5 दिवसांची सुट्टी द्यावी, अन्यथा तुम्ही माझ्या बायकोला समाजावून सांगावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पोलीस शिपायाने म्हटले आहे. दरम्यान, सध्या सोशल माध्यमातून हा अर्ज मोठ्या प्रमाणात झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.