WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गदाजीबोरी येथे अवैध विक्री देशी दारू पोलिसांनी केली जप्त

Image

देशी दारूच्या 205 बाटल्या अंदाजे किंमत 20500 रूपयांचा मुद्देमाल जप्त...!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगांव- तालुक्यात अवैधरीत्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी गदाजी बोरी येथे पोलिसांनी धाड टाकून विस हजार पाचेशे रुपयांची देशी दारु जप्त केली असून एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातुन देशी दारूच्या 205 बाटल्या जप्त केल्या असून आरोपीला अटक केली.

मारेगांव तालुक्यातील गदाजी बोरी येथील होळीच्या पर्वावर नागरिकांची होणारी मोठी गर्दी पाहता या दिवशी गांवात देशी दारु विकण्यासाठी ही दारू दडवून ठेवण्यात आली होती ही अवैध दारू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश मंडळवार यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर यांनी सोमवार दिनांक 9 रोजी सायंकाळी सहा वाजता धाड टाकली. धाडीच्या ठिकाणी पाच बॉक्स देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. परंतु अवैध देशी दारू विक्रेता कुंदन जानबाजी नान्हे याला अटक करुन देशी दारूच्या 205 बाटल्या त्याचे अंदाजे किंमत 20500 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून मारेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा 65(ई)कलमे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट जमदार भालचंद्र मांडवकर करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.