WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव, अवघ्या 99 धावांवर भारतीय संघ ऑल आउट

Image

महिला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 185 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ फक्त 99 धावांची मजल मारू शकला. भारतीय संघाचे चार खेळाडू अवघ्या 30 धावांच्या आतच आउट झाले.

स्मृती मंधाना 11 आणि जेमिमा रोड्रिग्ज शून्यावर पवेलियनमध्ये परतली. तर टुर्नामेंटमध्ये आपल्या दमदार प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करणारी युवा खेळाडू शेफाली वर्मा फक्त 2 धावांवर आउट झाली.सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावून भारताला 184 धावांचे टार्गेट दिले. ऑस्ट्रेलियाची ओपनर एलिसा हिलीने 75 आणि बेथ मूनीने नाबाद 78 धावांची खेळी केली. हे हिलीच्या करिअरमधील 12वा आणि मूनीचा 9वा अर्धशतक आहे. भारताच्या दिप्ती शर्माने 4 ओवरमध्ये 38 धावांवर 2 विकेट्स घेतल्या.

भारताने आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकाल नाही

यापूर्वी 6 वेळेस टी-20 वर्ल्ड कप झाला आहे, ही 7वी वेळ होती. भारताने आतापर्यंत एकदाही टुर्नामेंटवर आपले नाव कोरले नाही. तर, ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त 5 वेळेस(यावेळेसचा मिळून) विश्वचषक जिंकला आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले