WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना घेऊन सेविकांचा निघाला भव्य मोर्चा

Image

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने हा मोर्चा फुलचूर नाका येथून काढण्यात आला.या मोच्र्याचे नेतृत्व दिलीप उठाणे,हौसलाल रहागंडाले,शंकुतला फqटग,आम्रकला डोंगरे,जिवनकला वैद्य,सुनिता मलगाम,राजलक्ष्मी हरिणखेडे,पौर्णिमा चुटे,बिरजुला तिडके,लालेश्वरी शरणागत,अर्चना मेश्राम,पुष्पा भगत,प्रणिता रंगारी,भुमेश्वरी रहागंडाले,ज्योती लिल्हारे,विठा पवार आदींनी केले.आंदोलनानंतर महिला बालविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.

अंगणवाडी सेविका,मदतनिस,मिनिअंगणवाडीसह मानधनावर काम करणाèयाना २१ हजार रुपये किमान वेतन लागु करणे,महागाई निर्देशांकानुसार १० हजार दरमहा पेंशन लागू करणे,आक्टोंबर २०१८ ते जुर्ले २०१९ पर्यंतचे बकाया एरीयस देणे,साडी ड्रेसेसचे परिवर्तन निधीची थकीत रक्कम देणे,प्रवास भत्याचे प्रलqबत देयके मंजुर करण्यात यावे,अंगणवाडी सेविकामधून ५० टक्के पदे पर्यवेक्षिकांची भरण्यात यावे,सेवामुक्त सेविका मदतनिसांना एकमुस्त १ लाख रुपेय व ७५ हजार रुपये अजुनपर्यंत मिळालेले नाहीत ते देण्यात यावे.नविन अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्यासांठी हा मोर्चा निघालेला होता.मोर्चा जिल्हापरिषदेवर पोचल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात रास्ता रोको करण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.