WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तीन महिन्यांत विकले 10 लाखांहून जास्त फोन, Redmi च्या ‘या’ स्मार्टफोनची बंपर विक्री-

Image

शाओमी’ची सबब्रँड कंपनी रेडमीच्या Redmi K30 या स्मार्टफोनला भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 10 लाखांहून अधिक Redmi K30 फोन्सची विक्री झाल्याची माहिती कंपनीने दिली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केलाय. लाँच झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांमध्येच कंपनीने विक्रीचा हा मोठा आकडा गाठलाय. कंपनी लवकरच Redmi K30 Pro ही पुढील आवृत्ती लाँच करण्याच्या तयारीत आहे. Redmi K30 ला मिळालेल्या शानदार प्रतिसादानंतर कंपनीच्या Redmi K30 Pro स्मार्टफोनबाबतही अपेक्षा उंचावल्या आहेत. भारतात हा फोन Poco X2 ब्रँडिंगसह उतरवण्यात आला असून 15 हजार 999 रुपये इतकी त्याची बेसिक किंमत आहे.

Redmi K30 फोनच्या 10 लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री झाल्याची माहिती कंपनीने दिली. कंपनीने दिलेल्या आकडेवारीमध्ये Redmi K30 4G आणि Redmi K30 5G दोन्ही मॉडेल्सच्या विक्रीच्या आकडेवारीचा समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर अधिकृत अकाउंटद्वारे कंपनीने याबाबत चाहत्यांना माहिती दिली. तसेच नव्या प्रो व्हेरिअंटबाबतही कंपनीने असाच विश्वास व्यक्त केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share