WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवजयंती नाचून नाही तर शिवरायांचे गुण अंगीबाळगून साजरी करा - संघपाल_महाराज

Image

समाज जोपर्यंत शिवरायांचे आचार,बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे क्रांतिकारी विचार आत्मसात करणार नाही आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणार नाही तोपर्यंत समाजाला त्याच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव होणार नाही,पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा आता समाजाने झुगारल्या पाहिजेत,भावाभावात तंटे लावणाऱ्यांना ओळखून त्यांची जागा त्यांना दाखविली पाहिजे,वर्षानुवर्षे आमच्यावर लादलेला खोटा इतिहास चिकित्सक बुद्धीने आम्ही फेटाळला पाहिजे,आज ओबीसींना आपल्या हक्कासाठी मैदानात उतरणे गरजेचे आहे,कोल्ह्या कुत्र्यांची जनगणना होते पण ओबीसींची जनगणना होत नाही,ओबीसींचा जनगणनेत कॉलम नसेल तर अशा जनगणनेचा आपण सर्वांनी धिक्कार केला पाहिजे,बहिष्कार टाकला पाहिजे असे प्रतिपादन श्री.संघपाल महाराज यांनी शिवाजन्मोत्सवानिमित्य रविवार दि.01.02.20 रोजी मौजा भेदोडा येथे आयोजित केलेल्या कीर्तनात केले.

मौजा भेदोडा येथे शिवराय विचार प्रसार प्रतिष्ठान यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली,याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या तसेच बहुजन महापुरुषांच्या कार्यावर आपले प्रबोधनात्मक कीर्तन सादर केले.यानिमित्त नवीन पिढीच्या हस्ते संघपाल महाराज यांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला तर ओबीसींचे अधिकार आणि जनगणना या विषयावर प्रभावी व्याख्यान देणारे युवक अविनाश रामटेके यांचा संघपाल महाराजांच्या हस्ते शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.समाज शिकला,वाचू लागला तरच आपले अधिकार आणि कर्तव्याविषयी जागृत होईल या दृष्टिकोनातून श्री.अशोक गड्डमवार यांनी गावकऱ्यांना कार्यक्रमादरम्यान शिवशाही हे पुस्तक १०० लोकांना आपल्या स्वखर्चाने वितरित केले तर ओबीसींचा कॉलम नसेल तर आमचा जंगणनेवर बहिष्कार असेल अशी पत्रके संपूर्ण गावकऱ्यांना वितरित करण्यात आली.कार्यक्रमा दरम्यान संघपाल महाराजांनी नाते आपुलकीचे संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या समाजकार्याची स्वतःहून दखल घेऊन कार्याची प्रशंसा केली,संस्थेमार्फत निस्वार्थपणे राबविले जाणारे उपक्रम हे निश्चितच स्तुत्य आणि अभिनंदनीय आहेत म्हणून त्यांनी संस्थेस भविष्यातील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास गावकरी तसेच आजूबाजूच्या लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती,हा कार्यक्रम आयोजित करणारे शिवराय विचार प्रसार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश आत्राम,सरपंच पुरुषोत्तम नैताम,उपाध्यक्ष सोमेश्वर दुरुटकर,सचिव मारोती पिंपळकर,कोषाध्यक्ष रणजित पिंपळकर,सदस्य संजय गिरी,संजय उईके,संजय सातपुते,संदीप पिंपळकर,नथु कोंडावार,मारोती सिडाम,प्रणय पारखी,सुरेश ठाकरे,उषन्ना राउतवार,दिवाकर गादंगीवार,पंढरी दुरुडकर,शंकर झाडे,सतीश कांबडे,सुनील सातपुते,वामन दुर्गे,गौतम रत्ने,सिद्धार्थ लोखंडे,विनोद वानखेडे,किरण कुंभारे,आकाश दुरुडकर,अतुल येरगुडे,चंद्रपूर,खोके साउंड सर्व्हिस,ताडे मंडप डेकोरेशन आणि संपूर्ण गावकरी बांधवांनी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रमाचे नियोजन उमेश पारखी यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले