WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मधुमेहींसाठी वरदान ठरणारी जखमपट्टी

Image

वायरलेस पद्धतीने नियंत्रण करण्यात येणारे बँडेज (जखम पट्टी) वैज्ञानिकांनी विकसित केले असून त्यात स्मार्टफोन सारख्या यंत्राच्या मदतीने विविध औषधे जखमेत सोडून ती भरून काढणे सोपे जाते. या बँडेजमध्ये अगदी बारीक सुयांची व्यवस्था केलेली असून त्याचे नियंत्रण वायरलेस पद्धतीने केले जाते. ‘अ‍ॅडव्हान्सड फंकशनल मटेरियल्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यात योग्य प्रमाणात औषधे बँडेजमधून जखमेत सोडण्यात येतात. प्रगत स्वरूपाची तंत्रज्ञानाधारित बँडेज ही जखम लवकर भरण्यासाठी उपयोगी असल्याचा दावा अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठातील सहायक प्राध्यापक अली टायायोल यांनी केला आहे.

जखम भरून येण्यासाठी अनेक जैविक प्रक्रिया गरजेच्या असतात. त्यात उतींची नव निर्मिती होते पण औषधांमुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने घडून येते. अगदी कमी छेद देऊन या बँडेजमुळे औषधे जखमेत सोडली जातात असे संशोधकांचे मत आहे. यात हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांचाही संशोधनात सहभाग आहे. स्मार्टफोनसारखे उपकरण यात बँडेजचे नियंत्रण करून अनेक औषधे सूक्ष्म सुयांमार्फत सोडत असते. या सुया जखमेच्या भागात खोलवर जाऊन अगदी कमी वेदनेसह औषध पोहोचवतात.

विशिष्ट भागातच ही औषधे दिली जात असल्याने त्यांचे इतरत्र परिणाम होत नाहीत. हे प्रयोग सुरुवातीला मधुमेही उंदरांच्या जखमांवर करण्यात आले असून त्यामध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यात जखमा भरून येण्याचा वेगही वाढतो. मधुमेहींमध्ये जखमा भरून येणे कठीण असते त्यामुळे त्यांच्यासाठी हे बँडेज वरदान ठरणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share