WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जुनाडा पुलामुळे वणी-भद्रावतीचे अंतर कमी

Image

वणी-उकणी मार्गावर जुनाडालगत वर्धा नदीवर २१ कोटी ५१ लाख रूपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे वणी ते भद्रावतीचे अंतर १५ किलोमीटरने कमी होणार आहे.या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा नदी वाहते. अनेकदा पावसाळ्यात नदीचा प्रवाह फुगून या गावाचा संपर्कदेखील तुटतो. पूर्वी जुनाडा सभोवताल कोळशाची खाण होती. पुल बांधण्यासाठी सर्वप्रथम नदीचे पाणी अडविण्यात आले. त्यानंतर पाईप टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ मे २०१९ ला या पुलाच्या बांधकामाची निविदा काढली. या पुलाचे बांधकाम झाल्यानंतर भद्रावती तालुक्यातील सुमठाणा, तेलवासा या गावांना हा रस्ता जोडला जाणार आहे. जुनाडापासून तेलवासा (ढोरवासा), सुमठाणावरून जाणाºया राज्य मार्गाचे अंतर केवळ नऊ किलोमीटरचे आहे.या पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट टीएनटी कंपनीला देण्यात आले आहे. पुलाची लांबी २.३० मीटर असून पुलाला चार मजबूत सिमेंट खांब राहणार आहे. चार खांबांचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. जुनाडा ते उकणीपर्यंत मोठा रस्ता नसल्याने या रस्त्याचे कामही काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. भालर ते जुनाडापर्यंत रस्त्याची दुरवस्था आहे. मात्र या रस्त्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती वणीचे सा.बां.उपअभियंता तुषार परळीकर यांनी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.