WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

करोना इम्पॅक्ट : टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याचा विचार?

Image

चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आलेल्या संकटाची व्याप्ती आता मोठी होत चालली असून त्याचे परिणाम आता जगभर दिसून येत आहेत. क्रीडाक्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. चीनमध्ये होणार्‍या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. शिवाय जगभरातील स्पर्धांमध्ये चीनी खेळाडूंना प्रवेश नाकारला जात आहे. परंतु यात आता एका मोठ्या काळजीच्या आणि धक्कादायक बातमीची भर पडली असून जपानची राजधानी टोकियो येथे पाच महिन्यांनंतर होणारी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी अशी चर्चा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एका सदस्याने प्रथमच ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

स्पर्धा सुरू होण्यास फक्त 148 दिवस शिल्लक आहेत. करोना व्हायरस वेगाने जगभर पसरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समितीचे सदस्य असलेले डिक पाऊंड यांनी जपान टाइम्सला सांगितले की, ही एक नवी लढाई आहे आणि आपल्याला त्याचा सामना करावा लागले. हा व्हायरस नियंत्रणात आहे का ? आपल्याला इतका विश्वास आहे का की आपण टोकियोला जाऊ शकू?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

अर्थात अद्याप स्पर्धा होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत वाच्यता करण्यात आलेली नाही, किंवा स्पर्धा अन्य ठिकाणी घेण्यासंदर्भात विचार केला गेला नाही. पण ज्या पद्धतीने करोना वाढत आहे त्यावरून अनुभवी अधिकारी देखील काळजीत पडले आहेत.

करोनाचे रुग्ण इटली, इराण आणि दक्षिण कोरियात आढळले आहेत. बुधवारी ऑस्ट्रिया, क्रोएशिया आणि स्वित्झर्लंडमध्ये देखील करोनाचे रुग्ण आढळले होते. या सर्व रुग्णांचा इटली दौरा झाला होता. अमेरिकेने हा व्हायरस जगभर पसरण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले