WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाघ्याचा हल्ल्यात कुत्रा ठार

Image

मार्डीजवळील  वडगांव परिसरातील घटना

मारेगाव तालुका प्रतिनिधी 

मार्डी परिसरात वाघाचा धुमाकूळ सतत सुरूच असून 3 फेब्रुवारीला रात्री वडगांव शिवारात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात श्वनाची शिकार केल्याची घटना घडली आहे, एकीकडे वाघ सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांची शिकार करत असताना वनविभाग मात्र 'तो' वाघ नव्हेच या अविर्भावात वावरत आहे.

वाघाला शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले असुन वाघ मात्र या कॅमेराना हुलकावणी देत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे.

३ फेब्रुवारीला रात्री वडगांव येथील सुनील देविदास ठावरी यांच्या शेतात असलेल्या श्वानाची शिकार केल्याची घटना पुढे आली.

त्याचा गळा व मान पूर्ण पणे फस्त केली असून वाघच असल्याचे शेतकरी ठासून सांगत आहे,इतर प्राण्यांना कोणताच प्राणी एवढा निर्दयतेने मारत नसून हे लक्षण जर बघितले तर वाघाशिवाय दुसरा प्राणी असूच शकत नसल्याचे अनेकांचे मत आहे.हा परिसर सतत वाघ्याचा दहशदित असून शेतकरी शेतात जाण्यास धजावत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share