WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ विधान परिषद निवडणूक आली रंगात , मतदारांना भेटण्यासाठी वापरला जात आहे हाय टेक फंडा....

ImageImage

सागर मुने, वणी

यवतमाळ विधान परिषद निवडणूक आता रंगात आली आहे , तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. यवतमाळ विधान परिषद यामुळे रिक्त जागेवर निवडणूक होत आहे विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला असल्याने या जागेसाठी निवडणूक होत आहे. मतदानला अवघे काही दिवस उरल्यामुळे प्रचाराला चांगलाच वेग पकडला आहे. उमेदवार मतदारांकडे पोहचण्यासाठी हाय टेक फंडा वापरात असल्याचे दिसत आहे.

या विधान परिषद निवडणुकीत ३ प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत,

महा आघाडी कडून दृश्यांत चतुर्वेदी यांना तर भाजपाकडून सुमित बाजोरिया हे उभे आहेत , संजय देरकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत रिंगणात ३ प्रमुख उमेदवार असल्याने घोडाबाजार तेजीत आला आहे. ६ वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ असतो ,पण या सहावर्षात दोनदा निवडणूक झाल्याने मतदारांना दोनदा लक्ष्मी दर्शनाचा लाभ मिळाल्याची चर्चा रंगून राहिली आहे.

वेळ कमी आणि जिल्हा मोठा असल्याने मतदारांना भेटायला चक्क हेलिकॉप्टर बोलाविले आहे. हेलिकॉप्टर चा वापर करून प्रचार करीत असल्याने या उमेदवाराची जिल्ह्यात चांगलीच चर्चा चालू आहे. तर आपल्या मतदाराला कोणीही फोडू नये म्हणून मतदाराला सहकुटुंब देवदर्शनाला आणि प्रेक्षणीय स्थळी पाठवले आहे. यामुळे मतदारांची मात्र चागलीच चंगळ होताना दिसत आहे सध्या यवतमाळ मध्ये थंडी जोर धरीत असताना राजकारण मात्र चांगलाच तापलंय.

वणी शहरात महाराष्ट्र विकास आघाडी चे अध्यक्ष आण्णा राव पाटील हे संजय देरकर यांच्या प्रचारासाठी वणीत हेलिकॉप्टर ने आले त्यांनी सरकारच्या विरोधात आम्ही नाही. आपल्या व्यक्तीला निवडून द्यावं मतदारांनी, प्रत्येक नागरिकांवर कर्ज आहे म्हणून कर्जमुक्त भारत झाला पाहिजे अशी नेहमी माझी मागणी असते असे त्यांनी पत्रकार परिषद मध्ये मत व्यक्त केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले