WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाठी गावात पत्नीने केली पतीची गळा आवरून हत्या

Image

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लाठी या गावात व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने ओढणीच्या सहाय्याने गळा आवरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजताचे सुमारास घडली.
लाठी या गावात मोतीराम धोबे (वय 48) हे पत्नी माया धोबे (वय 37) वास्तव्यास आहे. त्यांना एक मुलगी व एक मूलगा असून दोघेही मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मृतक मोतीरामला दारूचे व्यसन जडल्याने तो नेहमी पत्नी माया हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायाने पतीचा काटा काढण्याचे ठरविले. नेहमी प्रमाणे गुरुवारी घरी आलेला मोतीराम रात्री झोपी गेला होता. मुलगी चंद्रपूर येथे गेली होती तर मुलगा झोपेत असल्याचे बघून शुक्रवारी पहाटे 5 वाजताचे सुमारास ओढणीच्या साहाय्याने पतीचा गळा आवरून त्याची हत्या केली. सकाळी ही वार्ता गावात वाऱ्या सारखी पसरली ठाणेदार दीपक पवार यांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून पत्नीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरक्षक योगेशकुमार दंदे करीत आहे.

Source - aapleyavatmal

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share