WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

फरार राठोड प्राध्यापक अखेर जेरबंद, वणी पोलिसांची बेधडक कारवाई

Image

अखेर 'त्या' उप प्राचार्याला वणी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, विनयभंग,पोक्सो प्रकरणी होता फरार.....!

लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे प्रकरण

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

वणी येथिल प्रसिद्ध असलेल्या, लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे करणारा उप प्राचार्य माणीक राठोड हा दि.17 डिसेंबर दिवसापासुन फरार होता.या आरोपिच्या मागावर वणी पोलीस होते.आज दि.13 जानेवारीला सकाळी 9 वाजताचे दरम्यान वणी - यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्यावर आरोपी उप प्राचार्य माणीक राठोड असल्याची गुप्त माहीती वणी डिबी पथकाला मिळाली या आधारे डिबी पथक सदर ठिकानी शिताफीने जावुन आरोपिला बेड्या ठोकल्या.अनं पोलीसांनी एकच स्वास सोडला.कारण हा माणीक राठोड 17 डिसेंबर पासुन फरार असल्यामुळे येथिल विविध सामाजीक राजकीय संघटनांकडुन आरोपी माणीक राठोडला अटक करण्याची मागणी सुरु असतांनाच आज दि.13 जानेवारीला सकाळी 9 वाजताचे दरम्यान वणी डिबी पथकाने वणी - यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळुन अटक केली.

माणीक राठोड रा.छोरीया ले आऊट गणेशपुर वणी असे त्या नराधम शिक्षकाचे नाव असुन तो वणी येथिल नामवंत असलेल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील जुनियर काँलेजचा उप प्राचार्य आहे.त्याने त्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केले होते.या प्रकरणी दि.17 व 18 डिसेंबरला त्याचेवर वणी पोलीसात तक्रार दाखल झाली होती.त्या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी भादंवी 354, (ड), 12 पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.परंतु आरोपी माणीक राठोड फरार होण्यात यशस्वी झाला होता.आरोपि फरार झाल्यामुळे वणी येथिल विविध संघटनांनी सदर आरोपिला अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे वणी पोलीसांना केली होती.वणी चे ठाणेदार वैभव जाधव यांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते.तेव्हापासुन वणी पोलीस आरोपी माणीक राठोडच्या मागावर असतांनाच आज दि.13 जानेवारीला सकाळी 9 वाजताचे दरम्यान वणी- यवतमाळ मार्गावर सदर आरोपी असल्याची माहीती मिळताच डिबी पथकाने सदर ठिकानी जावुन आरोपीला बेड्या ठोकल्या.

सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक,पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली डिबी पथकप्रमुख पोउनि,गोपाल जाधव,पोहवा.सुदर्शन वानोळे,सुनिल खंडागळे,सुधिर पांडे,रत्नपाल मोहाडे,पंकज उंबरकर,दिपक वांड्रसवार यांनी केली.

सदर गुन्ह्यातील पुढील तपास सपोनि,निखील फटींग,पोका.अमोल नुनेलवार करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले