WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रेस वेलफेअर तर्फे पत्रकार दिन साजरा

Image

सागर मुने,वणी

येथील प्रेस वेलफेअर असोसिएशन वणी तर्फे नगर वाचनालयात दि. 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी या संघटनेचे अध्यक्ष गजानन कासावार हे होते. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक माधव सरपटवार हे होते. अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार विनोद ताजने हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर चवणे यांनी केले. त्या नंतर प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना सरपटवार म्हणाले की, वयाची केवळ 34 वर्ष जगलेल्या बाळशास्त्री जांभेकर हे एकमेव अद्वितीय होते. त्यांनी अफाट अशी कामगिरी करून स्वातंत्र्य पूर्व काळात जनजागरणासाठी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे 'दर्पण' पाहिले मराठी वृत्तपत्र काढुन जागृतीचे काम केले. अत्यंत प्रतिभावान बाळशास्त्रीचे वृत्तपत्रसृष्टी सोबत सर्वसामान्यवर सुद्धा त्यांचे खूप उपकार आहेत. त्यानंतर बोलतांना विनोद ताजने म्हणाले की, जांभेकर हे प्रतिभावंत होते. त्यांना आंतरराष्ट्रीय 11 भाषेचे उत्तम ज्ञान होते. ते अस्कलिखित पणे बोलत सुद्धा होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक सुद्धा म्हटले जाते.

अध्यक्षीय भाषण करतांना कासावार यांनी बाळशास्त्री यांच्या जीवनाचा आढावा घेऊन स्पर्धेच्या युगात वृत्तपत्राचे महत्त्व व विश्वास टिकवून ठेवण्याचे काम आजच्या पत्रकार व वार्ताहरावर आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले. आभार प्रदर्शन जितेंद्र डाबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश तांबे, तुषार अतकारे, अनिल बिलोरिया, बंडू निंदेकर, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share