WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतीय सैन्यात असलेल्या राजूर कॉलरी येथील जवनाचा अपघाती मृत्यू...

Image

▪ *अंत्यसंस्कार राजूर येथे होणार असल्याची प्राथमिक माहिती...*

वणी:तालुक्यातील राजूर कॉलरी येथील भारतीय भु-सैन्य दलात असलेले 34 वर्षीय जवनाचा गुरुवारी रात्री 10:30 वाजताचे सुमारास मथुरा येथे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.या जवानावर जन्मगाव असलेले मूळ गाव राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या राजूर कॉलरी येथील नरेंद्र लक्ष्मण सोलंकी हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. भु-सैन्य दलात कार्यरत असलेल्या नरेंद्र यांची सेवेचा करार जवळपास संपतच आला होता.गुरुवारी रात्री मथुरा येथे दुचाकीने जात असताना नरेंद्र यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.नरेंद्रच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे.

या घटनेची माहिती मिळताच नरेंद्र यांचे कुटुंब राजूर येथून मथुरेकडे रवाना झाले आहेत.शक्यतो उदयाला नरेंद्रवर राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share