WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रफुल व प्रियल ठरले राष्ट्रीय पुरस्कार चे मानकरी

Image

वणी- लगतच्या मुकूटबन येथील प्रफुल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांना राज्यस्थान येथे आयोजित ह्युमन सोशल फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. दगदगीच्या धावपडीच्या या सोशल मिडीया च्या युगात माणवापासुन दुर गेलेल्या जिवनात हे युवक रक्तदान क्षेञात कार्य करीत कित्येक युवक मिञमंडळी ला जोळुन एक रक्तदान क्षेञाची गाडी योग्यरित्या चालवित आहे. रक्त हे मानवी जिवनातील मूल्यवान घटक आहे. रक्तदानामुळे दुसऱ्याच्या जिवाला जिवनदान दिले जाते. गेली कित्येक दिवस वर्ष रक्तविर बहुउद्देशीय संस्था तर्फे महाराष्ट्र ब्लड डोनर नावाने व्हाट्सएप समुह बनवुन संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारत देशातील कित्येक रक्तदान क्षेञातील ब्लड कोओर्डीनेटर ला एकञ करून महाराष्ट्र तसेच भारत मध्ये सरकारी रूग्णालयातील गरजु गरीब रूग्णाला रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे काम या समुहातुन केले जात आहे. रक्तविर बहुउद्देशीय संस्था तर्फे जुळण्यात आलेले महाराष्ट्र ब्लड कोओर्डीनेटर आशीष भावसार नागपुर, अभी ठाकुर अमरावती, गणेश मुद्दमवार मुकूटबन, राहुल कुरझडकर नागपुर, शुभम निपाने गोंदिया, चैतन्य तेलरांधे वर्धा, सागर इळकर चिमुर, गोकुल जुमनाके अर्धवन, स्वप्नील अलगदेवे ब्रम्हपुरी, धिरज भोयर वणी असे ब्लड कोओर्डीनेटर यापुर्वी रक्तदान क्षेञात कार्य करीत पुरस्कृत आहे. गर्भवती महिला, लहान मुले बालक, अपघातग्रस्त इत्यादी गरजु गरीब रूग्णाला सरकारी रूग्णालयात रक्तदाते उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच रक्तदान क्षेञात चांगले कार्य केल्याबद्दल प्रफुल भोयर व प्रियल पथाडे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित केले आहे. अखंड भारत मधील जवळपास ४५० ब्लड कोओर्डीनेटर ला हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तसेच ब्लड बैंक मधील कार्यव्यवस्था अतिशय सरळ सोपी व रूग्णाला उपयोगी कशी करता येईल याबद्दल प्रश्न व चर्चासञ करण्यात आले. या न्याशनल अवार्ड सेरेमनी व कॉन्फरन्स चे आयोजन राज्यस्थान मधील हनुमानगढ़ येथे ह्युमन सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते. यावेळी एन. बि. टि. सी. चे उपनिर्माते डॉक्टर साईप्रसाद भवसार, ह्युमन सोशल फाउंडेशन चे सचिन सिंघला, गगन अरोरा, अभिमन्यु, माजी मंञी डॉ. रामप्रताप, उपस्थित होते. तसेच हरीयाना, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना, केरळ, तमिल नाडु, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, अशा कित्येक राज्यातील ३०० टिमचे ४५० लोक उपस्थित होते. सर्वात कमी वयेगटातील महाराष्ट्र मधील या युवकांची हि महाराष्ट्र ब्लड डोनर टिम अतिशय आकर्षित व नावलौकीक ठरली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share