WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंगनाथ नगर वणीतील प्रतिनि नागपुरेने मर्यादित साधनांमध्ये मिळवले ८७ टक्के यश

Image

वणी – मॅक्रून स्टुडंट्स अकॅडमी, वणी येथील विद्यार्थिनी प्रतिनि नितीन नागपुरे हिने दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबाचे व शाळेचे नाव उज्वल केले आहे. प्रतिनिचे यश हे तिच्या कठोर परिश्रमाचे आणि पालकांच्या मोलाच्या पाठिंब्याचे फळ आहे.

ती रंगनाथ नगर, वणी येथे राहत असून तिचे वडील नितीन बंडू नागपुरे आणि आई अश्विनी नितीन नागपुरे यांनी मर्यादित साधनसामग्री असूनही तिच्या अभ्यासात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. प्रतिनिने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले.

तिच्या या यशाबद्दल शाळेत आणि समाजात सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share