WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जेष्ठ नागरीक म्हणून 60 वर्ष वय असे असताना एसटी महामंडळ केवळ 65 वर्षाच्या जेष्ठांना सवलत देते का ?

Image

ग्राहक प्रहार संघटनेचा संतप्त सवाल ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे कडे तक्रार दाखल !

पूर्ण भारतात जेष्ठ नागरीक म्हणून 60वर्ष जाहीर करण्यात आले .त्या अनुसंघाणे शासनाच्या सवलती लागू करण्यात आल्या परंतु महाराष्ट्र शासनाचे एसटी महामंडळ प्रवाशांना वरील सवलत लागू करायला तयार नाही .ज्यांचे वय 65आहे त्यांनाच एसटी प्रवासात सवलत देते व ज्यांनी आधार कार्ड बनवताना ज्यास्त वय टाकून घेतले अथवा इतर प्रमाणपत्र आहेत अशांना सवलत देते त्यामुळे एसटी महामंडळाच्या विरोधात प्रचंड असंतोष असून यवतमाळ जिल्यातून ह्या बाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत .ह्या बाबत डेपोचे अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले ,राज्य मंत्रिमंडळात हया बाबत ठराव झाल्यावर आमच्याकडे त्याची प्रत आल्याशिवाय आम्ही 60 वर्षे वयाच्या व्यक्तीला सवलत देणार नाही .प्रवाशांचे सेवे करता असे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाचे अधिकारी नियमावर बोट ठेवून भारत सरकारने 60 वर्षे वयाला जेष्ठ नागरीक संबोधित करीत असताना एसटी महामंडळ मानायला तयार नसल्या बद्दल नुकत्याच झालेल्या ग्राहक प्रहार संघटनेच्या बैठकीत खेद व्यक्त करण्यात आला !ह्या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना पाठविण्यात आले असून ह्या निवेदनावर ग्राहक प्रहार संघटनेचे अजय दुंमनवार,प्रसाद नावलेकर,भैय्यासाहेब ठमके,यशवंत काळे,सुनील धवाने,दिलीप वाढई,दामोधर बाजोरीया, जयंत बावणे,सचीन मेश्राम,कृतांजय देशपांडे,शेख सत्तार शेख रज्जाक सह अनेकांच्या सह्या आहेत . शासनाने दखल न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share