WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्राहक प्रहार संघटनेच्या निवेदनाची अखेर दखल.... शिवशाही बस उड्डाणपुलाखालूनच जाणार....

Image

शिवशाही ही बस उड्डाणपुल झाल्या पासून वरून जात होती .पाटनबोरी चे प्रवासी 1किमी आधी उतरवून परस्पर उड्डाणपुलावरून जात होती .ह्या बाबत ग्राहक प्रहार संघटनेचे पाटनबोरी चे अजय दुमनवार व जयंत बावणे ह्यांनी हया बाबत ग्राहक प्रहरच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला.

ह्या बाबत प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार सघटना ह्यांनी पुढाकार घेऊन पांढरकवडा व अमरावती चे डेपो मॅनेजर ह्यांच्याशी संपर्क करून परिवहनमंत्री रावते साहेब ह्यांचे कडे रीतसर तक्रार नोंदविली परंतु अमरावती डेपोचे मॅनेजर जैस्वालजी ह्यांनी मागणी योग्य असल्याने तातडीने आदेश काढले पाटनबोरी येथे जर शिवशाही बस उड्डाणपुलाखालून थांबली नाही तर वाहकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याची प्रत संघटनेला मेल वर पाठविण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून त्याचं प्रमाणे वृत्तपत्रातून दखल घेण्यात आल्याने यश लवकर प्राप्त झाले असल्याचे सुद्धा बोलून दाखविले त्यामुळे ग्राहक प्रहार संघटनेचे प्रसाद नावलेकर, दामोदर बाजोरीया, अजय दुंमन्वार, कृतांजय देशपांडे,जयंत बावणे,सचिन मेश्राम आदीनी समाधान व्यक्त केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share