WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भरधाव ट्रॅक्टर पल्टी....

Image

ट्रॅक्टर ऑटोची धडक:- मोठी घटना टळली.....

सुरज चाटे वणी - शहरातील मुख्य मार्ग समजल्या जाणारा वणी यवतमाळ मुख्य मार्गावरील साई मंदिर परिसराजवळील मार्गावर एक भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने होते ते वणीच्या दिशेने येणाऱ्या ऑटोवर गेले मात्र यावेळी कोणताही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी मात्र घटनास्थळी जमली होती व काही वेळाकरिता तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती.

यवतमाळ वणी मुख्य मार्ग सारखा वर्दळीचा मार्ग म्हणून परिचित आहे आज दिनांक 13 ला दुपारच्या दरम्यान ट्रॅक्टर ने चुकीच्या मार्गाने आपली एंट्री घेतली व वणीकडे येत असलेल्या ऑटोला धडक दिली त्यात ट्रॅक्टर अचानक पलटी झाला व ऑटोतील प्रवाशी जखमी झाले असून ऑटोचे व ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. जखमीना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून. ट्रॅक्टरचे ऑइल लीक झाल्याने रस्त्यावर ऑइल पसरत होते मोठी घटना टळली असून काही वेळाकरिता रस्त्यावर मोठी बघ्यांची गर्दी जमत वाहतूक खोळंबली होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share