WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीकर ' राम रंगी रंगले '

Image

सुरज चाटे वणी - येथील जैताई चैत्र नवरात्रात भंडारा येथील स्वानंदी संच प्रस्तुत राम रंगी रंगले या भक्तीगीतांच्या कार्यक्रमात वणीकर रसिक अक्षरशः रंगून गेले. गीतांची उत्तम निवड , नेटके निवेदन , गायकांचा सुरेल आवाज आणि उठावदार वाद्यसंगत यामुळे कार्यक्रम रसिकांच्या प्रशंसेला पात्र ठरला. कार्यक्रमाची निर्मिती , संकल्पना व निवेदन आरती मुकुंद देशपांडे यांचे होते. स्वामिनी सुभेदार ( पुणे ) या नवोदीत गायिकेने सादर केलेल्या कबीराचे विणतो शेले , मी राधिका प्रेमिका आणि पांडुरंग कांती दिव्यतेज या गाण्यांनी रसिकांना विशेष रिझविले. आरती भालेरावची रामा रघुनंदना , रामचंद्र मनमोहन आणि उठी श्री रामा ही गीते छान झाली. अमरावतीच्या प्रज्वल कळसकरने स्वये श्रीराम प्रभू ऐकती ,पराधीन आहे जगती व वृंदावनी वेणू ही गीते प्रस्तुत करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. कीबोर्ड वर पंकज देशमुख , तबला शीतलकुमार मांडवगडे आणि ऑक्टोपॅडवर प्रज्वल पातुरकर यांनी कामगिरी छान बजावली. रसिक श्रोत्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share