WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भिषण अपघातात 4 ठार तर 16 गंभीर....

ImageImage

वाढदिवसाला जाताना काळाचा घाला :- नॅशनल हायवे वरील चित्त थरारक घटना...

सुरज चाटे वणी - यवतमाळ जिल्यातील वडकी येथून जवळच असलेल्या कारेगाव पुलाजवळील आज दि १२/४ रोजी दुपारी २,५० वाजताचे दरम्यान कार आणि ऑटो च्या भीषण धडक मध्ये ४ जण जागीच ठार तर १६ जण जखमी झाल्याची भीषण घटना घडली असून या घटनेने सर्वत्र परिसरात एकाच खळबळ पसरली असून संबंधितांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नागपूर वरून येत असलेली फिगो कार गाडी क्र, एम एच ३१ डी व्ही १०८७ चालक विशाल अशोक पराते वय ३७ वर्ष रा,मोहदा व सोबत त्यांची भाऊ सून पत्नी सौ प्रेरणा सारंग पराते व सोबत पुतणी, रा,मोहदा,हे तिघे नागपूर वरून मोहदा येथे आपल्या फिगो कार नि जात असताना वडकी पोलीस स्टेशन हद्दीत नॅशनल हायवे क्र सात जवळ येत असलेला ऑटो क्र एम एच २९ व्ही ९४९६ याला समोरासमोर जबर धडक दिली, यात कारमधील असलेले तिघेही गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले,ही धडक एवढी भीषण होती की ऑटो पलटी होऊन दोन तुकडे झाले,यात ४ जण जागीच ठार तर १६ जण गंभीर जखमी झाले, ऑटो मधील असलेले सर्व प्रवाशी हे वडकी येथील जवळच असलेल्या रिधोरा येथील असून ते सर्व वर्धा जिल्ह्यातील असलेल्या आजनसरा येथे नातेवाईकांच्या मुलाचा वाढदिवस असल्याचा कारणाने साजरा करायला जात होते, मदातच त्यांचेवर काळाचा घाला झाल्याने,ऑटो चालक अरविंद उर्फ बालू बोरूले वय ४० रा रिधोरा,येनुबाई शेषराव जुमनाके वय ६० वर्ष रा रिधोरा, उमाबाई गुलाब शेंडे वय ५५ वर्ष मु,रिधोरा, संगीता अरविंद बोरूले वय ३५ मु रिधोरा हे चार जण जागीच ठार झाले,तर जखमी मध्ये असलेले लक्ष्मी विजय गुरुनुले वय २० वर्ष मु रिधोरा,विद्याबाई वडतकर वय ४० वर्ष मु रिधोरा,सरला काशीनाथ तोडासे वय ४० वर्ष मु,रिधोरा या तिघांना वर्धा जिल्ह्यातील वडणेर येथे हलविण्यात आले,तर काही जखमी प्रवाशाला राळेगाव येथे हलविण्यात आले त्यातील जया लोनबले वय ३० वर्ष,वेदिका बोरूले वय १८ वर्ष,समीर उईके वय १५ वर्ष,मंदा शेंडे वय ४० वर्ष,धनश्री तोडासे वय १० वर्ष,कांताबाई बोरूले वय ५० वर्ष,साधना शेंडे वय २३ वर्ष,मयंक शेंडे वय २३ वर्ष,नंदिनी सोनवणे वय १० वर्ष,भाग्यश्री शेंडे वय २३ वर्ष हे सर्व जखमी प्रवाशी रिधोरा येथील असून यांची प्रकृती चिंताजनक असल्याने याना राळेगाव वरून यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे,हा अपघात बघण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती,घटनास्थळी,वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार ए,पी,आय प्रशांत गीते,पी,एस आय दीपक कांकरेडवार सह सूरज चिव्हाणे,गणेश मेसरे,राजू मोहोड,मिलिंद गोफने,सह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते पुढील तपास पोलिस करीत असून मृतांचा आकडा सध्यातरी स्पष्ट नसला तरी अजूनही 16 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे, त्यांच्यावर दवाखान्यात इलाज सुरू आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share