WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजी मुख्यमंत्री यांच्या एंट्रीने मतदार व उमेदवारांना संजीवनी....

Image

मतदारांच्या प्रश्नांना फोडली वाच्या :- चौकीदार ही चोर है चा मुद्दा पुन्हा वणीत चर्चेचा विषय...

सुरज चाटे वणी - चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले देश का चौकीदार चोर है । परंतु सगळे चौकीदार चोर नाही बिचारा आमचा चौकीदार प्रामाणिकपणे चौकीदार करतो . या चौकीदाराने देशातील चौकीदाराना बदनाम करून टाकले आहे. मल्याने लुटी एस बी आई ललित भगोडा है, इन्होने डुबाइ पीएनबी मेहुल भागीदार है क्यो की चोर ही चौकीदार है। अशा पद्धतीने ही अवस्था निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर देशाच्या शेतकऱ्यांची दैनावस्था करून टाकली आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून टाकले आहे. कधी पाहिलं का हो शेतकऱ्यांना स्वतः ला चितेवर पेटवून घेताना संवेदनशीलता कशाला म्हणतात या सरकारला काही वाटते की नाही आता लोक म्हणतात या सरकारला कंटाळून अब की बार बस कर यार बहोत हो गया यार । हे उत्तर लोकांकडून यायला लागले आहे. बेरोजगाराचा प्रश्न मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये 13 जागेसाठी 7 हजार अर्ज होते यावरून बेरोजगारांना काम दिले नाही. बँकांची अवस्था फार वाईट सरकारने बँकेला चुना लावला त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे तेव्हा अनेक प्रश्नांना लोकांना सामोरे जावे लागत आहे .तेव्हा देर आई दुरूस्त आई असे म्हणत आपल्याला बाळू नावाने नवसाचा उमेदवार मिळाला आहे तेव्हा अशा या उमेदवाराला बहुसंख्य मताधिक्याने विजयी करून द्यावे असे मत व्यक्त केले.तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याने काँग्रेस तथा उमेदवार व मतदारांमध्ये नवी संजीवनी निर्माण झाला असून एक वेगळाच कौल दिसून येत आहे तर जनमानसात खमंग चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.

वणी येथील वसंत जिनिग लांन येथे 1 एप्रिल 2019ला दुपारी 3 .00 वाजता लोकसभा प्रचारार्थ व्यक्त केले यावेळी मा श्री विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार, राजाभाऊ उंबरकर, वसंतराव पुरके, डॉ महेंद्र लोडा, हंडोरे, मोरेश्वर टेमुर्डे, भारतीय कांग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे उमेदवार बाळूभाऊ धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी व्यसपीठावर अडव्होकॅटे देविदास काळे, प्रतिभाताई धानोरकर, अरुनताई खंडाळकर, गीत घोष, उत्तम गेडाम, नरेंद्रपाटील ठाकरे रुद्रा कुचनकार, डॉ मोरेशवर पावडे, वजाहात मिर्जा, जयसिंग गोहोकार, राकेश खुराणा, पुरुषोत्तम आवारी, संजय खाडे, उपस्थित होते. जाहीर सभेचे सूत्रसंचालन विवेक मांडवकर यांनी केले तर आभार प्रमोदभाऊ निकुरे यांनी केले या प्रसंगी जाहीर सभेला वणी मारेगाव झरी वरोरा भद्रावती कोरपना राजुरा येथील स्त्री पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थित मतदारांनी बाळूभाऊ ला विजयी करण्याचा संकल्प दिसून आला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share