WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोवा मुक्ती संग्राम सैनिक प्रल्हादपंत रेभे यांचे दुःखद निधन

Image

सुरज चाटे वणी - येथील गोवा मुक्ती संग्राम सैनिक तथा गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रल्हादपंत कृष्णराव रेभे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दि. 30 मार्चला पहाटे 12*30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांना गळ्याचा कर्करोग झाला होता. त्यांच्या मागे एक भाऊ, पाच मुले, दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे.

पारतंत्र्याच्या काळापासून समाज व देश सेवेची आवड असणारे प्रल्हादपंत यांच्यावर राम मनोहर लोहिया व महात्मा गांधींच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता. युवा अवस्थेपासूनच ते विविध चळवळी सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेले गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. हे राज्य भारतात विलीन करून घेण्यासाठी साठच्या दशकात जे प्रचंड आंदोलन झाले त्यात प्रल्हादपंतांचा सक्रिय सहभाग होता. मनाने अतिशय दानशूर असलेले हे व्यक्तिमत्व सर्व सामान्यांसाठी मदतीचा हात नेहमी पुढे करीत होते. गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभागी सैनिकांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या जाण्याने या संघटनेचे अतिशय नुकसान झाले आहे. वणी परिसरात देशाला व गोवा राज्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी स्वातंत्र्याच्या यज्ञ कुंडात उडी घेतली होती. त्यापैकी आज कोणीच हयात नाहीत. प्रल्हादपंत हे या पिढीतील शेवटचे रत्न होते. त्यांच्या निधनाने या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्षधाम मध्ये दि. 31 मार्चला दुपारी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share