WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निवडणूक काळात 18 लाखाची रक्कम जप्त...जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकार:- रक्कमेसह एकास ताब्यात

ImageImage

सुरज चाटे वणी - चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक इसम आपल्या दुचाकीत मोठी रक्कम घेऊन जात असल्याचा माहितीवरून आज दिनांक 28 ला पोलिसांनी 18 लाख 81 हजार रुपयांची रोकड पकडली असून सदर व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

सध्या निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणांत सुरू असून आप आपल्यापरीने मतदारांची जुळवाजुळव करताना उमेदवार दिसून येत आहे, त्यातच दिनांक 28 ला जो प्रकार समोर आला त्याने एकच खळबळ उडाली असून चंद्रपूर येथील शरद रामटेके नावाचा इसम आपल्या दुचाकीमध्ये रक्कम घेऊन येत असल्याची माहिती मिळाली.त्यावरून पोलिसांनी हे वाहन येताच त्याची तपासणी केली असता डिकीतून 18 लाख 81 हजार रुपये सापडले. रक्कम मोठी असल्यानं निवडणूक अधिकाऱयांनी आयकर विभागाला चौकशीचे निर्देश दिले. पोलिसांनी शरद रामटेके यास ताब्यात घेतलं. ही रक्कम नेमकी कशासाठी नेली जात होती, कुणाची होती, राजकीय पक्षांचा काही संबंध आहे काय, याचा तपास सुरू आहे. आता ही रक्कम नेमकी आहे तरी कुणाची ? याबाबत खमंग चर्चा जोर धरत असून कोण्या राजकीय पक्षांचा तर यात हाथ नाही ना? असा प्रश्न बघ्यांच्या गर्दीतून उपस्थित होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share