WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोमीनपुरा येथे मोठा अपघात.....देव तारी त्याला कोन मारी :- सुदैवाने सर्व बचावले....

Image

सुरज चाटे वणी - वणीतील मोमीनपुरा परिसर सारखा वर्दळीचा असतो त्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवक जावक व रेलचेल असते दिनांक 26 ला दुपारी 3 च्या दरम्यान एका ओमनी चारचाकी गाडीला छोटा हत्ती चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली ही घटना सीसीटीव्ही मध्ये टिपली असून, अपघात इतका गंभीर होता पण सुदैवाने जीवित हानी टळली आहे, मोठा अपघातापासून बचाव झाला असून देव तारी त्याला कोण मारी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मोमीनपुरा येथील हयात ऍक्वा जवळील रजा पान सेंटर च्या समोर दिनांक 26 मार्च ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान रजा पान सेंटर जवळ ओम्नी चारचाकी वाहन पाण्याची कॅन घेण्याकरिता थांबले त्यात ओमणीचे डाव्या बाजूचे दार थोडे उघडले असता ओमनीच्या मागून येणाऱ्या भरधाव छोटा हत्ती चारचाकी वाहनाने डाव्या बाजूच्या ओमनीच्या दाराला जोरदार धडक दिली, त्यात ओमनीच्या समोरचा संपूर्ण भाग उखळला गेला व महत्वाचे म्हणजे त्याच बाजून लहान मुलगी बसली होती, परंतु त्या मुलीला व ओमनीत असलेल्याना साधी खरोज सुद्धा आली नाही, ओम्नी चारचाकी वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे, परंतु ''देव तारी त्याला कोण मारी'' असेच या अपघातात बोलल्या जात आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद...अशा ठिकाणी तिसऱ्या डोळ्यांची गरज.....

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आली असून अझर यासिन चिनी यांच्या घरच्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण व्हिडीओ आला आहे तर यातून अशा मार्गाच्या परिसरात सीसीटीव्ही ची किती आवश्यकता आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

सुसाट गाडी चालकांवर अंकुश लावणे आवश्यक ....

कायद्याचे उल्लंघन करून अशा सुसाट गाडी चालविणाऱ्यावर कारवाईची गरज निर्माण झाली असून यांवर अंकुश लावणे अत्यावश्यक झाले आहे, जर अशांवर अंकुश लागला नाही तर मोठी घटना होण्यास वेळ लागणार नाही. उपविभागीय वाहतूक निरीक्षक वणी यांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share