WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीतील राजकारण तापणार.... निवडणुकीची रणधुमाळी सुरू बड्या नेत्यांच्या लागताहेत बैठकांवर बैठका.....

Image

सुरज चाटे वणी - वणीसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणधुमाळी ला सुरुवात झाली असून आता जमेल त्या पद्धतीने कार्यकर्ता व उमेदवार यांनी आपली कंबर कसली असून आपला उमेदवार कसा चमकेल या दृष्टिकोनातून फिल्डिंगा लागत आहे. वणी हा राजकारणाचा बालेकिल्ला असून या ठिकाणी सुद्धा लोकसभा विशेष तयारी सुरू आहे. तर ज्यांना उमेदवारी जाहीर झाली अशांची आता विधानसभा क्षेत्रात वारी सुरू झाली असून बैठकांवर बैठका दिसून येत आहे तर कार्यकर्ते सुद्धा जीव की प्राण करून आपला उमेदवार निवडून येणार या दृष्टीकोनातून आपली शक्कल लढवत आहे, त्यामुळे वणीचे राजकारण तापणार असेच चित्र दिसून येत आहे.

चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राकरिता दिगंजानी आपल्या आशीर्वादासह त्या त्या पक्षाचे उमेदवार घोषित केले आहे तर उमेदवारही मागे न राहता दिवस रात्र एक करून आपली खासदारकी पक्की करण्याच्या नियोजनात दिसून येत आहे. वणीचे राजकारण हे काही वेगडेच असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, विधानसभा आदी विविध निवडणुका ह्या वणीच्या इतिहासात तेरु मेरू च्या वातावरणात भर पाडणाऱ्या ठरल्या आहेत त्यातच काही संस्थांच्या सुद्धा निवडणुका चुरशीच्या ठरत आहे.

त्यामुळे आता संस्था तथा आदी दिग्गज मंडळींच्या आशीर्वादाने जो उमेदवार रिंगणात उतरला त्यांची पकड मजबूत दिसून येत असून त्यांच्याकडे संपूर्ण नियोजन आखण्यात येऊन जबाबदाऱ्या सुद्धा देतांना वरिष्ठ मंडळी दिसून येत आहे. त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकी मध्ये चांगलीच रंगत रंगणार असेच चित्र दिसून येत आहे. विकासाचा महामेरू सोबत घेऊन आव्हाहणाच्या भरवश्यावर निवडून लढणार की ते पूर्ण करणार? यात मात्र जनमानसात संभ्रम असून आता मतदार कोणाच्या दिशेने पाऊल टाकतात याकडे मात्र उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांना मिळतोय अप्रत्यक्ष पाठिंबा.....

मर्जीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शविण्याकरिता आपल्या परीने पक्षाची पर्वा न करता काही उमेदवार प्रेमींनी निवडणुकी पर्वावर त्यांना जरी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पणे आपल्या मर्जीच्या उमेदवारांसह असल्याचे सुद्धा रणधुमाळीत दिसून येत असून निवडणूक चर्चेचीच ठरणार असल्याची मात्र खमंग चर्चा पसरत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share