WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बाळू धानोरकर, हंसराज अहिर, महाडोळे यांच्यासह २१ उमेदवारांचे नामांकन दाखल

Image

चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नामर्निदर्शन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये अपक्ष मिलिंद प्रल्हाद दहिवले, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे ॲड. भूपेंद्र वामन रायपुरे,आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे नितेश आनंदराव डोंगरे,अपक्ष अरविंद नानाजी राऊत, अपक्ष नामदेव केशव किनाके,प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियातर्फे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीतर्फे राजेंद्र श्रीरामजी महाडोळे , इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे सुरेश नारायण धानोरकर, भारतीय जनता पार्टीतर्फे हंसराज गंगाराम अहिर , बहुजन मुक्ती पार्टीतर्फे गौतम गणपत नगराळे , नव समाज पक्षातर्फे विद्यासागर कालिदास कासर्लावार,अपक्ष राजेंद्र कृष्णराव हजारे, बहुजन समाज पार्टी सुशील सेगोजी वासनिक, अपक्ष रमेश मारोतराव कडुकर,गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे नामदेव माणिकराव शेडमाके,अपक्ष शैलेश भाऊराव जुमडे, अपक्ष अभिजीत राजू बेल्लालवार, अपक्ष अशोकराव तानबाजी घोडमारे, अपक्ष अभिनंदन महादेव भेंडाळे, भारतीय मानवाधिकार पार्टीतर्फे दामोदर श्रीराम माथने यांचा समावेश आहे. तर दिनांक 20 मार्च रोजी बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पाटीचे दशरथ पांडुरंग मडावी यांनी नामांकन दाखल केले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी उदया 26 मार्च रोजी होणार आहे. 28 मार्चला उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. 29 मार्चला उमेदवारांच्या अंतिम यादीची घोषणा होणार असून प्रचाराची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे. लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदार संघात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share