WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुंगोली येथे क्षयरोग जनजागृती शिबीराचे आयोजन... शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी चमू.....

ImageImage

सुरज चाटे वणी - जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंगोली येथे क्षयरोग जनजागृती शिबीर राबवण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपेश ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोलगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय कोहळे, रूपराव अतकरे, बबन गोहणे, भाऊराव ताजने, रोहिदास ठाकरे, भाऊराव दुर्वे आदिनाथ अतकरे, प्रेमचंद बोभाटे. गुणवंत ठाकरे, नीलकंठ दुर्वे उपस्थित होते. यावेळी तालुका क्षयरोग पर्यवेक्षक विजय धोंगडे यांनी क्षयरोग व एच आय वि विषयी माहिती दिली. तसेच नीता बदकुले यांनीही क्षयरोग विषयी मार्गदर्शन केले. यावेळी पांढरकवडा विभागीय समन्वयक अधिकारी प्रशांत कांबळे, दिपलेश्वर मंदुरकर, हर्षाली दडाँजे यांनी रक्त तपासणी केली.यशस्वीतेसाठी अरुण कोयरे, तेलतुंबडे, प्रमोद भाकरे, दीपा धोटे, पथाडे यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share