WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भिषण अपघातात दुचाकीस्वार जळुन खाक.....वणी-मारेगाव रोड :- दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू....

Image

सुरज चाटे वणी - वणी-मारेगाव मार्गावरिल निंबाळा फाट्याजवळ ट्रक-दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीसह दुचाकीस्वार जळुण खाक झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. दिपक शियाराम केवट(21)रा.राजुर काँलरी असे अपघातग्रस्त युवकाचे नाव आहे.दिपक आपली दुचाकी क्र एम एच 29 ए एच 8802 या गाडीने राजुर वरुव मारेगावकडे जात असता निंबाळा फाट्याजवळ मारेगावकडुन भरधाव येणारा ट्रक क्र एमएच 43 ई 5951 याची जोरदार धडक बसली.या अपघातात दिपक शिवराम केवट हा युवक जागिच ठार झाला आहे.अपघात इतका भिषण होता की अपघातात दुचाकीला आग लागल्यामुळे दुचाकीसह दुचाकीस्वार जागीच जळुन ठार झाल्याची घटना आज दि.24 मार्च ला दुपारी 3 वाजताचे दरम्यान घडली.

या घटनेची माहीती वणी पोलीसांना मिळताच सहा.पोउनि काकडे,डिबी पथकाचे सुनिल खंडागळे,सुधिर पांडे यांचेसह पोलीस कर्मचारी घटना स्थळावर दाखल झाले.घटनेचा पंचनामाकरुन म्रुत्युदेह शवविच्छदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केला होता घटनेचा पुढिल तपास वणी पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share