WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अनं काँग्रेस चा मोठा निर्णय....अखेर काँग्रेस ची लोकसभा उमेदवारी धानोरकरांनाच....

Image

दोन दिवसात दोन उमेदवार बदलवून शेवट शिकामोर्तब…

सुरज चाटे वणी -लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून गेल्या दोन दिवसापुर्वी विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेञाची उमेदवारी जाहीर झाली असल्याचे काॅग्रेस पक्षाकडून जाहिर करण्यात आले होते,विनायक बांगडे बाबत,विनायक बांगडेच्या लोकसभा उमेदवारी सबंधात पक्ष कार्यकर्त्यां बरोबर मतदारात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विनायक बांगडे यांचा,केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढे टिकाव लागणार नाही असे बोलल्या जात होते तर विविध चर्चाना पेव फुटला होता.आज भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेञाची उमेदवारी जाहीर झाली असून ते निवडणूकीचा फॉर्म भरणार असल्याची माहिती आहे तर उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करून तसे पञक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

काॅग्रेस पक्षाचे राष्ट्रीय जनरल सचीव,मुकूल वासनिक याच्या स्वाक्षरीचे,आजचे पञ असून,यात आमदार सुरेश धानोरकरांचे नाव चंद्रपूर लोकसभा उमेदवारी करीता जाहिर करण्यात आले आहे. संभ्रमात असलेले कार्यकर्त्यांनी आता काँग्रेस तिकिटावर बाळू धानोरकर यांचा शिक्कामोर्तब झाल्याने सुटकेचा श्वास सोडला असून आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असे दिसत असून आता या निवडणुकीत कोण कुणाला किती पाणी पाजणार हे मत्र मतदारांच्या हातात असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीतील निकालचा ठरवणार आल्याचे दिसून येते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share