WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वादळ वाऱ्यासह पावसाने शाळा क्र 3 चे छत उडाले......

ImageImageImageImageImage

निवडणूक केंद्राचेच बेहाल :- तात्काळ उपाय करण्याची गरज....

सुरज चाटे वणी - वणीसह परिसरात दिणांक 21 च्या रात्रीच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह गारपीट अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात वणी सह परिसरात मोठे नुकसान झाले असुन वणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक 3 चे मागचे छत उडून संपूर्ण छतच समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असून सदर शाळा 37137 निवडणूक केंद्र असून तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अवकाळी पावसाचा तडाखा गेल्या 2 दिवसांपासून होळीच्या अगोदर पासून चांगलाच धुमाकूळ घालत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दिनांक 21 ला झालेल्या अवकाळी पावसाने डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक 3 चे चक्क छतच उडाले असून यावरून वादळाचे प्रमाण किती असेल याचा नेम बघे आपआपल्या मर्जीने लावत होते. घटनेची माहिती संबंधित केंद्रप्रमुख परसावार सर तथा शाळेची मुख्याध्यापिका उमा राजगडकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली व दिणांक 22 ला भरणाऱ्या शाळेतील वर्गांचे नियोजन करून नैसर्गिक आपत्तीचा कोणताही परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होऊ नये या दृष्टीकोनातून तात्काळ दुसऱ्या खोलीत त्याचे योग्य नियोजन केले व विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे सुरू ठेवले. निवडणुका तोंडावर पाहता निवडणूक केंद्राचे झालेले हाल अतिशय बिकट असून त्यावर तात्काळ उपाययोजनांची गरज निर्माण झाली असून जर निवडणूक काळात जर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर अश्या निवडणूक केंद्राचे काय होणार? हा मात्र चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक प्रतिनिधीनी यावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शाळेकडे आमचे संपूर्ण लक्ष.....

लोकप्रतिनिधी तथा व्यवस्थापन समिती शाळेच्या विकासाकडे जातीने लक्ष देतात आताच शाळेचे बांधकाम तथा नवीन छत बनविण्यात आले असून निसर्गाच्या लहरीपणा समोर काही नाही नैसर्गिक रित्या झालेला अपघात आहे असे यावेळी केंद्रप्रमुख परसावार सर तथा शाळेची मुख्याध्यापिका उमा राजगडकर यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share