WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बाळू धानोरकर काँग्रेस च्या तिकीटनेच लोकसभा लढणार......

Image

तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा :- गावपुढाऱ्याणकडे फिल्डिंग चालू......

सुरज चाटे वणी - चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामची तयारी जिकडे तिकडे सुरू झाली असून पक्ष श्रेष्टींकडे आपला मोर्चा वाढवीत आपल्या बाजूने तिकीट पक्की करण्याकडे जो तो दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत कांग्रेसकडून उमेदवारीची दावेदारी करणारे शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देत मी लोकसभेसाठी सज्ज आहे असे दणकेदार उत्तर विरोधकांना दिले. चंद्रपूर लोकसभेसाठी कांग्रेसकडून विशाल मुत्तेमवार यांचं नाव समोर येताच कांग्रेस गटात खळबळ उडाली होती नंतर जिल्ह्यातील कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मुत्तेमवारांच्या उमेदवारीचा विरोध दर्शविला, त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तात्काळ बैठक बोलावत चंद्रपूर लोकसभेसाठी कुणाचं नाव जाहीर केलं नाही, आता धानोरकर यांनी तडकाफडकी आमदारकीचा तथा आदी विविध सेनेतील पदांचा राजीनामा दिल्याने आणखी नवा मोड निर्माण झाला असून बाळू धानोरकर लोकसभा लढणार हे मात्र यावरून स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीकरिता कांग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार विजय वडेट्टीवार व आमदार बाळू धानोरकर यांची नावे चर्चेत होती परंतु ऐनवेळी मुत्तेमवार यांचं नाव समोर येताच चंद्रपूर कांग्रेसमध्ये नाराजी पसरली. आता आमदार बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा लढविण्याची पूर्ण तैयारी केली आहे, कांग्रेस पक्षातर्फे त्यांना आधी राजीनामा द्या नंतर आपल्याला लोकसभा निवडणूक साठी कांग्रेसकडून उमेदवारी देऊ असे निर्देश दिल्याची माहिती असून, आता ही लोकसभा निवडणूक अहिर साहेब विरुद्ध धानोरकर साहेब असणार असून निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची खमंग चर्चा आहे, तर आता यात नेमकं बाजी कोण नेणार हा मात्र चर्चेचा विषय बनला असून आपले गणित जुडवून मतदारांना दिलेल्या सेवा सुविधेचा लाभ आता उमेदवारांना नक्कीच होणार असल्याचे सुद्धा आटातटीच्या वातावरणात दिसून येत आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share