WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उर्स मधून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन

ImageImage

रफीक शेख गड़चांदुर :- कुसळ येथील हजरत रहमान दुलैनशहा बाबा रहेमतुल्ला अलैह यांचा उर्स हिंदू व मुस्लिमधर्मीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकोप्याने साजरा केला. कुसळचा हा शाही उर्स म्हणजे कुसळच्या इतिहासातले एक महत्वाचे पान आहे, हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्यामुळेच कुसळच्या उरूसला आगळी शान आहे, या शब्दांत आमदार अँडव्होकेट संजय धोटे यांनी या एकोप्याचे कौतुक केले.

कुसळ येथील या उरूसासाठी दरवर्षीप्रमाणे पूर्ण गाव तसेच दर्गा परिसर गजबजलेला होता. विविध स्टॉल, खेळण्यांची दुकाने मोठ्या संख्येने मांडण्यात आली होती. बाहेरगावाहून बरीच मंडळी खास या उरूसासाठी उपस्थित होती. उरूसाच्या तिसऱ्या दिवशी रात्री कौमी एकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार अँड.संजय धोटे, वनविकास महामंडळ चे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, शाकीर मल्लक ,अरुन नवले,आबीद अल्ली यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. तसेच बहारदार कव्वालीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत रंगला. अजीत जानी व नुसरत अल्ली या नामी कव्वालांनी देशभक्तीवर कव्वाली गायली, त्यावेळी चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. कुसळ व परिसरांतील असंख्य मान्यवर मंडळी व आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने कव्वालीच्या कार्यक्रमास उपस्थित हp>

यंदाच्या उरूसात येणाऱ्या पाहुण्यांना, गावकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व नियोजित कार्यक्रम सुरळीत पार पडले. उर्स कमिटी व कुसळ गाववसीयाच्या मदतीने हा उत्सव हिंदू-मुस्लिम एकोप्याने साजरा करण्यात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share