WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतकरी पुत्राला नवनवीन वाद्याचा शोध लावण्याची गोळी...

ImageImage

नावं देण्यात मात्र संभ्रम :- शैलेशची संगीत क्षेत्रातील वाद्य बनविण्यात उंच भरारी .......

सुरज चाटे वणी - वणी तालुक्यातील पुनवट हे गाव काहीच किलोमीटर अंतरावर असून पुनवट येथील उमेश दिनकर राखुंडे या शेतकऱ्या चा पुत्र शैलेश उमेश राखुडे या 18 वर्षीय युवकाने स्वतः भजनाची व आदी संगीतमय वाद्य तयार करीत आपली आगळी वेगळी पसंद दाखवीत त्याने नव युवकांना एक आव्हान देत आजच्या युगात सुद्धा भजन, तसेच त्याच्या संगीतमय वाद्याची गरज किती महत्वाची असल्याचे यावरून स्पष्ट केले आहे. त्यांनी नवनवीन वाद्याचा शोध लावीत त्याचे नाव सुद्धा देने त्याला कठीण जात असून अशा वाद्याचे नाव काय ? असा संभ्रम त्याला पडला आहे, तर त्याने संगीत क्षेत्रातील जाणकार तसेच वाद्याच्या गुरूंकडे आपली वारी वळविली असून त्यांना सुद्धा याबाबत सविस्तर माहिती नाही.

पुनवट येथील 18 वर्षीय युवकाने वयाच्या 6 वर्षा पासून भजन संध्या या क्षेत्रात गोडी असून त्याला वाद्य तयार करण्याची एक आगळी वेगळी इच्छा निर्माण होऊन त्यापासून त्याने आपली इच्छाशक्ती दाखवीत अथांग प्रयत्न करून भजन तथा संगीत क्षेत्रात वापरण्यात येणारे विना, तानपुरा, सीतार, सोलमंडल, सारंगी, गिटार, ब्यांजो, किंगरी, चोंग चोंग, मांडोलीण, वायलीन, बासरी, साईनाई, सुरत, खंजिरी, डमरू, दाहक, तबला, ढोलक, नाल, हार्मोनियम (पेटी) आदी वाद्य स्वतःच्या मेहनतीने तयार करून त्याने आपली कलाकृती दाखवून आधुनिक युगात युवकांकरीता एक आवाहन दिले आहे.

आजच्या आधुनिक युगात युवक वॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी प्रकारच्या सोशिअल मिडिआ मुळे भांबावून गेले असून युवक युवती दिवसागणिक याकडे आपला अधिक वेळ घालवताना दिसून येते तर शेतकरी पुत्र पुनवट येथील शैलेश या युवकाने आपली कला बाकीच्या क्षेत्रात न वळविता त्याला त्याने वेगळे वळण देत त्यातून एक नवं युवकांना मिळणारी संजीवणी जणू त्याने आपल्या या वाद्यातून तयार केली आहे. आजच्या जगात युवक वर्ग आधुनिक संगीत कड़े आपला कल दाखवितात परंतु या शेतकरी पुत्राने आपली कलाकृती पारंपारिक संगीत क्षेत्रातील वाद्य तयार करण्या करिता दाखवून त्यातून त्याने उत्कृष्ट प्रकारची वाद्य तयार केली आहे, त्याला घरी वाद्य बनविणे खूप आवडीत असून त्यातून त्याला खूप समाधान व्यक्त होते, भविष्यात त्याला एक मोठासुतार काम करणारा स्वता वाद्य घडविणे, त्यापासून त्याला एक हाथाला काम लागले असून शेतकरी पुत्र शैलेश हा आयटीआय झाला असून त्याला सुतार कामात खूप गोडी आहे, त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्याची निर्मिती करीत असून 2 ते 3 वाद्य मिळून एक वाद्य त्याने तयार केले असून आता त्याला नाव ठेवण्यात मात्र आता त्याची तारांबळ होत आहे, शैलेश ने आवाहन केले आहे की या वाद्याला चांगले नाव सुचवावे जेणेकरून संगीत जगतात व वाद्य तयार करण्याच्या जगात शेतकरी पुत्राचे नावलौकिक होणार.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share