WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आचारसंहिता काळात गाडीत 10 लाख 80 हजाराची रोकड....

Image

रोकड नेमकी कशाची :- नाकाबंदीदरम्यान दोन संशयित ताब्यात

सुरज चाटे वणी - आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान कारमध्ये १० लाख ८० हजाराची रोकड आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते कोपरणा येथील आहेत.

शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ गाडी क्रमांक (एमएच ३४, बीएफ ८०२२) ची तपासणी करत होते. यावेळी गाडीमध्ये १० लक्ष ८० हजार रुपये आढळले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share