WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गुद्दलपेंडी परंपरेला शेवटची घरघरा.....

ImageImage

रंगपंचमीला मल्लांचा थरार :- मनगटातील ताकत निगते बाहेर....

सुरज चाटे वणी - अभिरुचीसंपन्न सुजाण कलावंताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या वणी शहराला विदर्भाच पूण असं म्हटलं जात अशा या वणी शहरात होळी सणाच्या पर्वावर रंगपंचमीच्या रात्री गुद्दल पेंडी नावाचा मैदानी खेळ खेळला जातो या खेळाला शे दोनशे वर्षाची परंपरा लाभली असून हा खेळ रंगपंचमी च्या दिवशी गुद्दल पेंडी या खेळाच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना या खेळातून मर्दानी मल्लांच्या खेळांचा परिचय करून दिल्या जाते ही परंपरा कायम ठेवण्यासाठी वणी शहरातील नामवंत अशी फार जुनी संस्था नृसिंह व्यायाम शाळा व शिवाजी व्यायाम शाळा या संस्था कार्यरत आहे तेव्हा हा गुद्दलपेंडी खेळ जिवंत राहील या दृष्टीने या साठी प्रयत्न रत असतात .

दरवर्षी नृसिंह व्यायाम शाळेचे पदाधिकारी संचालक मंडळ व सदस्य सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन व वणी शहरातील सांस्कृतिक सामाजिक परंपरा जोपासत आहे .वणी शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून होळी या सणाच्या पर्वावर रंगपंचमीच्या दिवशी सकाळी 8 वाजता नाड्याची पूजा करण्याकरिता नृसिंह व्यायाम शाळेत व्यायामपटू एकत्रित जमा होवून सर्व व्यायाम शाळेचे पदाधिकारी रॅली काढून रंगनाथ स्वामी मंदिरात नाड्याची पूजा करून शहरात बॅंड वाज्याच्या गजरात गुद्दलपेंडी च्या नाड्याचे दर्शन शहरवासीयांना करून देतात त्यानंतर रात्री ला 7 ते 10 वाजेच्या दरम्यान यात्रा मैदानावर गुद्दलपेंडी या खेळाचा अनुभव येथील जनता घेतात हा खेळ खुल्या मैदानामध्ये दोन खांबांना एक जाड दोरीच्या स्वरूपात नाडा बांधला जातो या दोरीच्या दोन्ही बाजूला 10 ते 15 मल्ल ज्याच्या मनगटामध्ये जोर आहे असे 10 ते 60 वर्षांपर्यंत चे वयोवृद्ध मल्ल प्रतिस्पर्ध्याना ठोसे लगावण्यासाठी नाड्यावर येतात व प्रतिस्पर्धी एकमेकांना ठोसे मारून एकमेकांच्या नाका तोंडातून रक्त काढतात हा प्रकार भयंकर असतो व क्षणभर माणूस हादरून जातो परंतु गुद्दलपेंडी चा थरार वणीकर अनुभवतात तसेच हा खेळ पाहणार्यामध्ये आवेश संचारतो व त्याचे ज्या कोणाशी भांडण झाले असेल तर तो होळीच्या दिवशी गुद्दलपेंडी या खेळात आवाहन करतो व त्याच दिवशी सर्व राग काढतो व खेळ संपल्यावर उरभेट घेऊन वैर संपवतो पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा खेळ नव्या पिढीला ज्ञात व्हावा या दृष्टीकोनातून सुरू ठेवण्यासाठी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष बाबाभाऊ कुलदिवार व शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुरे , पुरुषोत्तम अक्केवार,पांडुरंग लांजेवार ,बाबूलाल पोटदुखे , रमेश उगले, अनिल मुजगेवर, दत्ता मुजगेवार, सुनिल मुजगेवार ,सुनील आक्केवार, जफर पटेल ,अब्दुल गनी ,नागोराव नलभीमवर, दिलीप येमुळवर, शेख शब्बीर , अजय बोबड,सूर्यकांत मोरे, सुरेन्द्र इखारे, पांडुरंग ताटेवार गुरुजी ,दिलीपराव खाडे, मोरेश्वर बॉंडे, प्रयत्न रत आहे .

आजही वणी शहराची सांस्कृतिक परंपरा टिकविण्यासाठी प्रयत्नरत आहे परंतु शासनाने व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे अन्यथा शेकडो वर्षांपूर्वी लाभलेली गुद्दलपेंडी हा मैदानी खेळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा लोकप्रतिनिधीनि तसेच पोलीस प्रशासनाने लक्ष घातले तर वणीची गुद्दलपेंडी ची परंपरा कायम राहील व येथील नागरिकांना खेळाचा आनंद घेता येईल अन्यथा या खेळाला शेवटचीच घरघरा दिसून येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share