WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरातील पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढून पाईप लाईनचे व्हॉलला झाकण बसवा !

Image

प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ.

आज 15 मार्च जागतिक ग्राहक दिना निमत्य प्रहार जनशक्ती पक्षाने जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सात वाजता रंगनाथस्वामी मंदिर परिसरात केले होते .प्रमुख व्यक्ते म्हणून बोलतांना प्रसाद नावलेकरम्हणाले ,वणी शहराचा विकास होत आहे पण शहर वासीयांनी उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईला सामना करावा लागतो ही समस्या कायम स्वरूपात मिटली पाहीजे ह्या करीता पुरेसे नियोजन झालेले दिसत नाही उन्हाळ्याची सुरवात झाली आणि मे बहिणी पाण्यासाठी सैरभर झाल्या आहेत जनतेने जर नगर परिषदेच्या कर भरला तर त्यांना पाणी पुरवठा करणे ही जवाबदारी नगर परिषदेची आहे त्याच प्रमाणे नगर परिषदेच्या ज्या पाईप लाईन चे व्हॉल आहे ते उघडे असून त्यात कित्येक जणांचे पाय मोडले आहे .वणी चे नगर परिषद ग्राहक हे का सहन करीत आहे ? ग्राहक संघटीत झाला तर सर्व समस्या सुटतील ग्राहक हा राजा असून तो त्याचे अधीकर विसरला आहे ती जागृती ग्राहक प्रहार संघटना करीत आहे असे प्रतिपादन केले व्यासपीठावरडॉ अब्दुल सत्तार , डॉ प्रशांत खैरे तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष,डॉ किशोर लांजेवार,प्रा.दिलीप मालेकर, सुनीलभाऊ सुसनकर, हे होते.उपस्थित ग्राहकांच्या समस्या व उपाय ह्या वर चर्चा सत्र घेण्यात आले वणी नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्या बद्दल खेद व्यक्त करण्यात आला ,वणी नगर परिषद हाच ग्राहकांच्या तक्रारीचा सूर होता. कार्यक्रमाचे संचालन,सुधाताई शिवरकर ह्यानी केले ,प्रास्ताविक प्रेरणा ताई काळे ह्यांनी केले,आभार ललिता पचारे ह्यांनी केले,कार्यक्रमाला सुंनंदाताई मांढरे ,करुणाताई पारशिवें सह अनेक स्त्री पुरुष महीला ग्राहक उपस्थित होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share