WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीमध्ये स्वयंरोजगार व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image

100 महिलांनी घेतला शिबिराचा लाभ

वणी: वणीमध्ये रविवारी 10 मार्चला महिलांसाठी कायदेविषयक सल्ला व लहुउद्योग प्रशिक्षण झाले. या शिबिरात 100 महिला सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला सक्षमीकरण या उद्देशाअंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. दुपारी एक ते चार वाजताच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हे शिबिर संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रीती लोढा यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा होते. शिबिरार्थ्यांना ऍड विजयाताई मांडवकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले तर भावना नवाते, प्रज्ञा नरवाडे व चंद्रपूर येथील लघुउद्योग विभागातील राजेश डोंगरे यांनी महिलांना स्वयंरोजगाराचे धडे दिले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉ. प्रीती लोढा म्हणाल्या की महिलांनी केवळ चूल आणि मुल पुरतं मर्यादीत न राहता आता महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनणे काळाची गरज आहे. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की केवळ प्रशिक्षण देणे इतकेच आमचे काम नसून इथे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना स्वरोजगारासाठी किंवा गृहउद्योगासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत येत्या काळात केली जाणार असून महिलांचा लघू उद्योजक बनवणे हे येत्या काळातले ध्येय असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष संगीता खटोड, विजयाताई आगबत्तलवार, हेमलता लांडगे, अर्चना मनोहरे, ज्योती मिश्रा, पूजा गडवाल, मंदा तामगाडगे, सुषमा मोडक उज्वला दानवे, रंजना एकरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share