WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पत्नीचा खून करून फरार असलेला आरोपी अखेर गजाआड.....

Image

डी बी पथकाची कारवाई :- 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

तालुक्यातील वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्धोनी येथे दि.4 मार्च ला राञी 9 वाजताचे दरम्यान आरोपि सुरज गेंदा भवेदी(35)याने त्याची पत्नी सोनावती(29)हिचेसोबत घरगुती कारनावरुन भांडन करुन तिला फरशीने व विटाने पोटावर,छातीवर,आणी कंबरेवर मारुन जिवाने ठार मारुन टाकले. यावरुन वणी पो.स्टे येथे कलम 302 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर आरोपी हा मध्यप्रदेशातुन मजुरी चे काम करण्याकरीता आला असल्याने व त्याचे जवळ मोबाईल फोन नसल्याने तो कोनाचेही संपर्कात येत नव्हता त्याचा शोध घेने पोलीसांपुढे एक आव्हानच होते. वणी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार व वणी पोलीस स्टेशनचे डिबी पथक आरोपिचा मुर्धोनी जंगल परीसरात कसुन शोध घेत होते.

दरम्यान दि.9 मार्च ला ठाणेदार वैभव कुमार जाधव यांना खबर मिळाली की फरार असलेला आरोपी सुरज गेंदा भवेदी हा वणी येथिल घोंसा रोड,लिलावती ले आऊट समोरील जंगल परीसरात लपुन आहे व तो काही वेळात मध्यप्रदेशात पळुन जाणार आहे.अशी खबर मिळताच ठाणेदार जाधव यानी आपला पोलिसी हिसका वापरीत तपासाचे चक्र वेगवान करून लगेच डिबी पथकास आरोपी पकडने बाबत मार्गदर्शन केले.डिबी पथकातील कर्मचार्यांनी घोंसा रोड येथील जंगल परीसरात आरोपिचा शोध घेत असतांना झुडुपाचे सहाय्याने लपुन बसलेला आरोपी सुरज गेंदा भवेदी हा दिसुन आला.

आरोपिला पोलीस आल्याची चाहुल लागताच तो जंगलाने पळत सुटला असता डिबी पथकातील कर्मचार्यांनी सदर आरोपिचा दोन-तीन किलोमीटर धावुन सिनेस्टाईलने पाठलाग करुन आरोपि सुरज ला पकडुन ताब्यात घेवुन वणी पो.स्टे येथे आणुन तपास अघिकारी यांनी सदर आरोपिस कलम 302 भादंवी मध्ये अटक करुन रविवारी वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक यवतमाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी वणी,यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव कुमार जाधव,पोऊनि अशोक काकडे,डिबी पथक कर्मचारी पोना.सुनिल खंडागळे,सुधिर पांडे,रत्नपाल मोहाडे,इमरान खान,नितीन सलाम,दिपक यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share