WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रक्तदान करून दिले अनेकांना जीवनदान.....

ImageImage

बाप लोकांनी घडविला समाजात नवा आदर्श :- दर तीन महिन्यांनी करतात रक्तदान .....

बाप लेकांचा समाजात एक नवा आदर्श ...

वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील अतिदूर्गम तालुका समजल्या जाणाऱ्या झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवासी मंगेश धनंजय पाचभाई आपल्या रक्तदानाच्या माध्यमातून हजारोंचे जीव वाचवताना नेहमीच आपल्या निदर्शनास आहेत . त्याच आपल्या मुलाचा आदर्श घेत मंगेश चे वडील म्हणजेच धनंजय राघोबा पाचभाई हे जनजाग्रूति नसल्याने रक्तदान करण्यास टाळाटाळ करायचे व आपल्या मुलाला रक्तदान करण्यास नकार द्यायचे मात्र आज ची परीस्थिती म्हणजेच आपल्या मुलाचे रक्तदाणाचे ' सामाजिक कार्य पाहुण वडील सुद्धा जनजागृती पाहुण मागील दोन वर्षापासून दर तीन महिन्याला न चुकता रक्तदान करतात . ही पिता पुत्रांची जोडी समाजात एक नवा आदर्श देतांना समाजात दिसतात . मंगेश नि आजपर्यंत 22 वेळा रक्तदान केले तर वडीलांनीही आजपर्यंत 10.वेळा रक्तदान केले .आहे ..

आपल्या समाजामध्ये रक्तदान महादान फाऊंडेशन च्या माध्यमांतून हजारो लोकांना रक्ताची मदत करून त्यांना जीवनदान दिले आहे . वारंवार रक्तदान शिबिर ' युवकांना जाग्रुत करण्याचे काम या रक्तदान महाडान फाऊंडेशन च्या माध्यमांतून केले जात आहे . चंद्रपूर ' यवतमाळ जिल्ह्यात जर का कुणाला रक्ताची गरज भासली आणि मंगेश पाचभाई यांना त्याचा बूगूल लागताच ताबडतोब त्यांची मदत करण्यास मँगेश नेहमीच तत्पर असतो .

अश्यातच मंगेश पाचभाई यांना जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात रक्तदूत नावाने ओळखले जाते. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वनी येथे शासकीय रक्तपेटी उपलब्ध करण्यात याव्हि यासासाठि रक्तदूत मंगेश पाचभाई नेहमीच शासन प्रशासनाशी संघर्ष करतांना दिसून येतोय तर शासनाचे लक्ष वेधन्यासाथी आपल्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहूनकेंद्रीय ग्रूह राज्य मंत्री हंसराज अहिर यांना गेल्या दोन वर्षापूर्वीच पत्र दिले. आणि ह्या गंभीर बाबींचा आढावा घेत केंद्रीय ग्रूह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी वनी येथे शासकीय रक्त पेटी ची मान्यता दिली आणि काम सुद्धा अंतिम टप्याट आले असून अवघ्या काही दिवसांतच ह्या रक्तपेटिचे लोकार्पण सुद्धा होण्याची वेळ दिसून येत असून रक्त हे हे त्यालाच कळते ज्याला त्याची गरज असते.


जिवात जीव असे पर्यंत रक्त दान करणार..... मंगेश पाचभाई...
रक्तदान महादान फाउंडेशन चे अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रा सह 
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदूत असलेले मंगेश पाचभाई नेहमी 
गरजूंच्या मदतीला धावून आल्याचे दिसून येते त्यातच, त्यांनी वॉट्स अप
 वर सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांची जुळवणूक करून ठेवली असून त्यांना 
सुद्धा रक्ताची गरज काय हे नवयुवकांना पटवून देत रक्तामुळे कोणाचाही जीव 
जाऊ नये जिवात जीव असेपर्यंत रक्तदान सेवा अविरत सुरू ठेवणार असे यावेळी 
दैनिक देशोन्नतीशी बोलताना सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share