WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत अंजली गायकवाड व जया रंगारी यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न

Image

वणी - येथील वसंत जिनिग लांन मध्ये स्व इंदिरा गांधी विचार मंच द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त लिटिल चाम्पस सारेगमप ची विजेती गायिका कु अंजली गायकवाड व नृत्यांगना लावणी फेम जया रंगारी यांचा सुरेल गीतांचा व नृत्य लावण्यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला .

या कार्यक्रमाचे उदघाटक भारतीय कांग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार हे होते तर अध्यक्षस्थानी अडव्होकॅटे देविदास काळे व प्रमुख पाहुणे सौ प्रतिभाताई धानोरकर ह्या उपस्थित होत्या यावेळी उपस्थित मान्यवराणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, व मा सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रजवलीत करण्यात आली या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते कु अंजली गायकवाड, अंगत गायकवाड, जया रंगारी, तसेच वादक पंकज देशमुख, ढोलवादक पुरुषोत्तम लोखंडे, तबलावादक स्वप्नील सरदेशमुख, योगेश चौधरी, शुभम मुनवाईक, नृत्यांगना सोलोमन, क्रिष्ठीना,यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार वामनराव कासावार,देविदास काळे, प्रतिभाताई धानोरकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विचार व्यक्त केले व कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनीताई रासेकर यांनी केले तर सुरेल गीतांची मैफिल व लावण्याची बहारदार मेजवानी गणेश वंदनेने झाली एकापाठोपाठ एक गीत जसे मनं मंदिरा तेजाने, घुमर घुमर रे, घागर घेऊन निघाली, शूर आम्ही सरदार, हे सुरानो चंद्र व्हा, संदेश आते है, दिवस तुझं फुलायचे झोपाय वाचून, अशा या बहारदार नृत्यानी व गीतांनी वणीकरांना मोहून टाकले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी झाली. व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालिनीताई रासेकर , मंगला झिलपे , नीलिमाताई काळे ,वंदना धगडी ,शाहीन पठाण ,संध्या रामगिरवार ,किरण कुट्टरमरे, मंदा पुसनाके ,मंदा सोनारखंन, ललिता बरशेट्टीवर , मंदा बांगरे ,सुरेखा वडीचार , वत्सला लांडे ,प्रमिला चौधरी, सविता रासेकर, अनिता गंजीवार, माला मांडवकर,व स्व इंदिरा गांधी विचार मंच महिला मंडळाने परिश्रम घेतले .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share