WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सावंगी सह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध - ना. सुधीर मुनगंटीवार

Image

वणी:- वणी तालुक्यातील सावंगी हे माझं गावं आहे. याच ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. या भूमीचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्यच आहे. त्यामुळे सावंगी सह पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्यासह पूर्ण सरकार कटिबद्ध आहे. असे उदगार महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काढले. ते सावंगी ते गडचांदूर याला जोडणाऱ्या पुलाच्या व विविध विकास कामांच्या भूमिपूजनसाठी सावंगी या त्यांच्या गावी आले असता त्यांचा व त्यांचे वडील सच्चीदानंद मुनगंटीवार यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. त्या समारंभानंतर ते बोलत होते.

या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारताचे गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदूरकर, वैदेही नायगावकर, पंचायत समिती सभापती लिशाताई विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे, बंडू चांदेकर, वणी शहर अध्यक्ष रवी बेलूरकर, राहुल सराफ, राहुल पावडे, प्रा. महादेव खाडे, विजय गारघाटे, वामन झाडे इत्यादी नेते उपस्थित होते. तीन ते साडेतीन हजार नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंगीचे सरपंच प्रविण पिदूरकर यांनी केले. सुधीरभाऊंच्या कार्याचा परिचय माजी सरपंच धनराज राजगडकर यांनी करून देतांना सुधीरभाऊंची 2004 प्रकृती अस्वस्थ असतांना या गावात महायज्ञ केल्यानंतर पुढील निवडणुकीत विजय पिदूरकर माझ्यासोबत विधानसभेत राहील असा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्णही केला पण विजुभाऊंनीच माघार घेतल्याची आठवण करून दिली. सुधीरभाऊ म्हणाले की, सावंगीवासीयांनी माझा व माझ्या वडिलांचा जो उस्फुर्तपणे प्रचंड पुष्पवृष्टी करून जंगी सत्कार केला त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. आज 5 कोटी रुपयांचे नदीवरील पूल, दीड कोटी रुपयांचे अंतर्गत रस्ते व 10 लाख रुपयांच्या जल शुद्धीकरण संयंत्रासाठीचे भूमिपूजन झाले आहे. या मातीत मी माझे बालपण घालवले आहे. असे सांगून वित्त मंत्री त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रममाण झाले. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वनौषधी पार्क व जगदंबा मंदिरापासून ग्राम दैवत चौकापर्यंत दीड कोटी रुपयांचा सिमेंट रोड देण्याची घोषणा केली. व यापुढेही माझ्या बाबाप्रमाणे या गावाला काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वस्त केले. माझी शेतीशी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचा सुद्धा विचार सतत मनात राहतो असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर आ. संजीवरेड्डी म्हणाले की, ना. सुधीरभाऊंच्या कार्यकर्तृत्वाने जसा सावंगीचा विकास होत आहे. तसा पूर्ण महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर आहे. त्यांच्या दूरदृष्टी मुळे विकास कामांना गती मिळाली. त्यानंतर अतिथीचे समयोचित भाषणे झाली. अध्यक्ष पदावरून बोलतांना ना. अहिर यांनी या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व जण तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले. या प्रस्तावित वणी घुग्गुस राज्य मार्ग ते शिंदोला गड चांदुर राज्य मार्गावरील या पुला मुळे 20 ते 25 किलोमीटरचा नागरिकांचा फेरा वाचणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पिदूरकर यांनी केले. आभार माजी सरपंच नानाभाऊ ढवस यांनी केले. या प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ना. सुधीरभाऊ म्हणाले की, सावंगीवासीयांनी माझा व माझ्या वडिलांचा जो उस्फुर्तपणे प्रचंड पुष्पवृष्टी करून जंगी सत्कार केला त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. आज 5 कोटी रुपयांचे नदीवरील पूल, दीड कोटी रुपयांचे अंतर्गत रस्ते व 10 लाख रुपयांच्या जल शुद्धीकरण संयंत्रासाठीचे भूमिपूजन झाले आहे. या मातीत मी माझे बालपण घालवले आहे. असे सांगून वित्त मंत्री त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रममाण झाले. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वनौषधी पार्क व जगदंबा मंदिरापासून ग्राम दैवत चौकापर्यंत दीड कोटी रुपयांचा सिमेंट रोड देण्याची घोषणा केली. व यापुढेही माझ्या बाबाप्रमाणे या गावाला काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वस्त केले. माझी शेतीशी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचा सुद्धा विचार सतत मनात राहतो असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर आ. संजीवरेड्डी म्हणाले की, ना. सुधीरभाऊंच्या कार्यकर्तृत्वाने जसा सावंगीचा विकास होत आहे. तसा पूर्ण महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर आहे. त्यांच्या दूरदृष्टी मुळे विकास कामांना गती मिळाली. त्यानंतर अतिथीचे समयोचित भाषणे झाली. अध्यक्ष पदावरून बोलतांना ना. अहिर यांनी या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व जण तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले. या प्रस्तावित वणी घुग्गुस राज्य मार्ग ते शिंदोला गड चांदुर राज्य मार्गावरील या पुला मुळे 20 ते 25 किलोमीटरचा नागरिकांचा फेरा वाचणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पिदूरकर यांनी केले. आभार माजी सरपंच नानाभाऊ ढवस यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share