WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रस्त्यासाठी शेतकरी रस्त्यावर....

Image

शेतकऱ्याचे बैलगाडीसह उपोषण.....

सुरज चाटे वणी :- घराकडे जाणारा रस्ता बंद केल्याने निळापूर येथील 70 वर्षीय एका शेतकऱ्याने कुटूंबासह सदर रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून आपल्या जनावरांसह येथील वणी तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे.

वासुदेव ठाकरे असे उपोषणकर्त्याचे शेतकऱ्यांचे नाव आहे.त्यांचे निळापूर या गावी घर आहे. गावठाण नकाशाप्रमाणे त्यांच्या घराकडे जाण्यासाठी मार्गही आहे.मात्र,गावातील शंकर ठाकरे व मनोहर ठाकरे यांनी या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याने अडचण निर्माण झाली आहे.या शेतकऱ्याचा दुधाचा व्यवसाय अडल्याने जनावरांना व बैलबंडी नेण्यासाठी जागाच उरली नाही.त्यामुळे या शेतकऱ्याने याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली.मात्र,ग्रामपंचायतिकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही.म्हणून त्यांनी वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली मात्र,त्यानंतरदेखिल कोणतीही कार्यवाही झालीच नाही. म्हणून जनावरे ग्रामपंचायत कार्यलयासमोर बांधावी लागत आहेत.त्यामुळे दूध व्यवसायावरदेखील त्याचा विपरीत परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून संबधित शेतकऱ्यांने आपल्या परिवारासह वणी येथील तहसील कार्यालयासमोर बैलबंडीवर बसून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.यावर आता शासनातर्फे काय सुजाव मिळतो याकडे शेकाऱ्याच्या नजरा लागल्या आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share