WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील केसुर्ली येथे ५ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. पूजा किसन मांढरे (२६) असे या आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिने आत्महत्या का केली हे अद्यापही गुलदस्त्यात असून हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. पोलीस याबाबत शहानिशा करीत आहे.

घुग्गुस येथे माहेर असलेल्या पूजाचा विवाह दोन वर्षापूर्वी केसुर्ली येथील रहिवाशी असलेल्या किसन मांढरे याच्या सोबत झाला होता. दोन वर्षाच्या संसारातच तिने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतला. हुंड्यासाठीचा तगादा लावल्यानेच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलाने केला आहे. विवाहितेचा पती किसन मांढरे हा ५ फेब्रुवारीला काही कामानिमित्त वणीला गेला होता. तर तिची सासू शेतात गेली होती. घरी कुणी नसतांना तिने दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी लाकडी फाट्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णलायात पाठविला.

मुलीने आत्महत्या केल्याची वार्ता कळताच मुलीचे वडील विजय नागपुरे तडफडकी वणीला आले. मुलीने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने त्यांचे दुःख अनावर होऊन डोळ्यातून सारख्या अश्रूच्या धारा वहात होत्या. पती कडून वारंवार होत असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला असून तशी वडिलांकडून तक्रारही दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलीस आत्महत्या प्रकरणाची शहानिशा करीत असून वडिलांच्या आरोपावरून हुंडाबळीच्या दिशेने तपास करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.