WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तलवारी बंदुकीसह तिन महिला अटकेत.....

Image

मुख्य आरोपी फरार :- 1 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त...

सुरज चाटे : चंद्रपूर जिल्हा हा मोठया वर्दळीचा जिल्हा म्हणून सर्वत्र परिचित आहेत या ठिकाणी दूरवरून लोक आपल्या कामकाजाने येत असतात परंतु जो प्रकार घडला हा काही वेगडाच दिसून येत असून चंद्रपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या जुनोना मार्ग या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयास्पद धाड टाकली त्यात त्यांना तलवारी, देशी कट्टा, बंदुकी, आमली पदार्थ आढळून आले याठिकाणी गैरकादेशीर कार्य सुरू असल्याचे लक्षात आल्या वरून त्या ठिकाणाहून तीन महिलाना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी सोनूसिंग जितसिंग टाक हा पळण्यात यशस्वी झाला असून संबंधित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Image

चंद्रपूर जिल्हा हा नव युवकांचा अभ्यास क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आदी बाबीत अग्रेसर असून दूरवरून विद्यार्थी व जनसामान्य नागरिक आपले महत्वाचे कामे करण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी येत असतात. मागील दिवसापासून चंद्रपूर सह परिसरात आमली पदार्थाची विक्री वाढत असल्याच्या तक्रारी जोर धरत असताना जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या लक्षात सदर बाब येताच त्यांनी तपासाचे चक्र जोरदार फिरवीत आपल्या सहकार्यांना कामाला लावीत पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी बाबूपेठ परिसरातील जुनोना मार्गावरील वित्तु बाबा मंदिराजवळ एका घराची संशयास्पद झडती घेतली असता त्यात त्यांना 25.29 ग्रॅम गर्द पावडर, एक देशी कट्टा, एक बारा बोअर बंदूक, 1 एअर बंदूक, 5 नग तलवार, 1 भाला, 3 चाकू, 2 सतूर, काढतूस व इतर साहित्य रोख रक्कम असा एकूण 1 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस आल्याची माहिती मिडताच मुख्य आरोपी सोनूसिंग जितसिंग टाक हा रफुचक्कर होण्यास यशस्वी झाला असून तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

मारलेल्या धाडीने शहरात एकच खळबळ उडाली असून हा साठा कशासाठी होता नेमका याचा कशासाठी वापर करणार होते, असे तर्क वितर्क निघत असून समोर तोंडावर असलेली आचारसंहिता व निवडणूक पाहता असे प्रकार?, पोलीस विभागाने सदर बाब लक्षात घेता मोठी कारवाई दिसून येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share