WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राष्ट्रीय विज्ञान दिन व बक्षीस वितरण

Image

सुरज चाटे वणी : :- येथील मराठी विज्ञान परिषद वणी विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेतर्फे वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे वणी विभाग अध्यक्ष प्रा. महादेव खाडे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रसाद खानझोड, संजय चचाने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत गारघाटे यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा. खानझोडे म्हणाले की, आपण वैज्ञानिक दृष्टीकोन भावनिक दृष्टीने पाहिल्यास तो वाढीस लागतो. कितीही अपयश आले तरी पुन्हा, पुन्हा, लगातार, बार- बार हा मंत्र आपण विद्यार्थ्यामध्ये जेव्हा रुजवू तेव्हा वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल. त्यानंतर बोलतांना संजय चचाणे म्हणाले की, निसर्गाव होणाऱ्या अतिक्रमणामुळे मुले समतोल बिघडला आहे. एका झाडामुळे एक हजार माणसांचे भोजन तयार होते. 15 लाख रुपयांचे ऑक्सिजन मिळते. 2 अंश तापमान कमी होते. 18 लाख रुपये किमतीच्या जमिनीची धूप होत नाही. 40 लाख किमतीचे पाणी शुद्ध होते. असे प्रतिपादन पर्यावरण या विषयावर बोलतांना केले.

अध्यक्षीय भाषण करतांना प्रा. खाडे म्हणाले की, मानवाच्या अविचारी वागण्याने नैसर्गिक चक्राला आज धोका निर्माण झाला आहे. निसर्गाची ही साखळी नीटपणे चालू राहावी यासाठी डोळस वैज्ञानिक दृष्टीकोनांची आवश्यकता आहे. मराठी विज्ञान परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या मोबाइल आणि विज्ञान शिक्षक या विषयावर झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणीचा आराध्य पुरुषोत्तम पिटलावार याने राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला. वणी विभागात घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्न मंजुषेत विवेकानंद विद्यालयाच्या निवेदिता इंगोले, कशीश नगराळे, पुष्कर सहारे या चमूने प्रथम क्रमांक मिळविला. गौरांग सरमोकदम, रसिका गावंडे, आर्या डहाळकर या शिक्षण प्रसारक मंडळाच्या चमूने द्वितीय क्रमांक मिळविला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार व लक्ष्मण इड्डे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय देवाळकर यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share